एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar : केळेवाडीच्या गाडीवाल्याला विचारणार का? गुन्हेगारी कमी कर..., त्या भागाचे चंद्रकांत पाटील अनेक वर्ष आमदार, पुण्यात गुन्हेगारीवर धंगेकरांचं रोखठोक मत

Ravindra Dhangekar : मी काय केळेवाडीच्या गाडीवाल्याला विचारणार का? गुन्हेगारी कमी कर...,त्या भागामध्ये चंद्रकांत पाटील अनेक वर्ष झाले आमदार, पुण्यात गुन्हेगारीवर धंगेकरांचं रोखठोक मत

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबारानंतर गुंड निलेश घायवळ (nilesh Ghaywal) आणि त्याचे कारनामे चर्चेत आले, त्याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा दावा काहींनी केला. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी याप्रकरणात भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. निलेश घायवळ (nilesh Ghaywal) ज्या पद्धतीने दादागिरी करतोय खोटा पासपोर्ट केला लोकांचे मुडदे पाडले किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचं धाडस होत चालला आहे, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. त्याचबरोबर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, अनेकांनी माझी तक्रार केली पण मला एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) फोन आलेला नाही. एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) आज पुण्यात दौऱ्यावर आहेत. मी त्यांची भेट घेणार आहे आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते यासंदर्भात त्यांना माहिती देणार आहे आणि कठोर आणि काही सक्त कारवाई करण्यासाठी मागणी करणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 Ravindra Dhangekar: चंद्रकांत पाटलांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं

मी महायुतीत आहे आणि मला याचा विसर पडलेला नाही. पण पुण्यात जे चाललंय त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. सगळ्या नेत्यांनी एकत्र येत या गुन्हेगारीला आळा घातला पाहिजेल थांबवलं पाहिजे, म्हणून मी बोलतो असंही धंगेकर पुढे म्हणाले आहेत. तर चंद्रकांत दादा पाटलांवर मी कुठलाही आरोप करत नाही पण ते पुण्याचे मोठे नेते आहेत मंत्री आहेत शहरात त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय याच्यावर बोललो तर काय चूक आहे. चंद्रकांत पाटलांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांवर देखील ते काय करतात याच्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.चंद्रकांत दादांनी बोलावं, त्यांनी काहीतरी करावं तरच पुणेकर तुमच्यावर विश्वास ठेवतील, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

  Ravindra Dhangekar: मी काय केळेवाडीच्या गाडीवाल्याला विचारणार का?

 तर गुन्हेगारीविरोधात सर्व पुणेकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि गुन्हेगारीचा बीमोड केला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. जे गुन्हेगार पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या आजूबाजूला वापरल्यामुळे यामध्ये सर्वसामान्य भरडला जातो. त्याच्यावर अन्याय झाला तर तो पोलीस चौकीत जात नाही. याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे. हे माझं मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष दिले पाहिजे. काहीतरी ॲक्शन प्लॅन केला पाहिजे. जेणेकरून पुण्यातली गुन्हेगारी संपली पाहिजे. मी आजपर्यंत एकाही मित्र पक्षातील नेत्याला वाईट बोललेलो नाही. माझी त्यांच्याशी दुश्मनी नाही. माझा त्यांच्या बांधाशी बांध नाही. निलेश घायवळ भविष्यात काय माझ्याकडे येणार नाही, पुण्याचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न हा चंद्रकांत दादांना विचारला पाहिजे. कारण त्या भागामध्ये ते अनेक वर्ष झाले आमदार आहेत. मी काय केळेवाडीच्या गाडीवाल्याला विचारणार का? गुन्हेगारी कमी कर, पानटपरी वाल्याला विचारणार का? ते पुढारी आहेत. नेते आहेत. आपले नेते असल्यामुळे आपण त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना विरोध नाही पण एक पुणेकर म्हणून मी त्यांच्याकडे एक ॲक्शन प्लॅन करा आणि गुन्हेगारी संपवा अशी मागणी करत आहे. 

 Ravindra Dhangekar:  तो पॅटर्न एकदा लावा आणि गुन्हेगारी संपवा

1995 साली ज्यावेळी भाजप शिवसेना सरकार आलं, गोपीनाथ मुंडे त्यावेळी गृहमंत्री होते. त्यांनी मुंबईची गुन्हेगारी मोडीत काढली. तोच पॅटर्न पुण्यात आला आहे. तो पॅटर्न एकदा लावा आणि गुन्हेगारी संपवा शेवटी पुणेकरांना दिलासा द्या, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.

 Ravindra Dhangekar: कोणी गुन्हेगार आपल्या स्टेजवर आला नाही पाहिजे

मला शिंदे यांचा फोन आला नाही, पण मी आज त्यांना भेटणार आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्याची सर्वांची जबाबदारी आहे. जर एखादा चुकीचा माणूस आपल्या नेत्याच्या बाजूला जात असेल आणि त्याचा गैरफायदा घेत असेल तर आपण आपल्या नेत्यांना आरसा दाखवला पाहिजे. सगळे भाजपचे नेते जे आतमध्ये कुजबूज करतात, तेही आले तर त्यांना कळेल की धंगेकर बरोबर बोलतात. देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये ते निलेश घायवळच्या भावाचं नाव घेतात, ते व्यासपीठावर उपस्थित आहेत असे सांगतात, त्यावर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, सर्व नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे अशी माणसे व्यासपीठावर नको आहेत. ते व्यासपीठावर आल्यामुळे सर्वजण अडचणीत येतात. कोणी गुन्हेगार आपल्या स्टेजवर आला नाही पाहिजे. आपल्या पक्षात आला नाही पाहिजे. त्याला उमेदवारी दिली नाही पाहिजे. आम्ही एक पुणेकर म्हणून हे सर्व बोलत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
Embed widget