एक्स्प्लोर

शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्टमध्ये बाळासाहेब आणि उद्धव या दोघांचाच फोटो

Uddhav Thackeray Birthday : शिंदे गटात सामील झालेले पुण्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब आणि उद्धव या दोघांचाच फोटो आहे. शिंदेंचा फोटो मात्र त्यांनी टाळला आहे.

Uddhav Thackeray Birthday : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेले पुण्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी तशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचाच फोटो आहे. गेल्याच आठवड्यात शिवाजी आढळराव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु त्यांचा फोटो मात्र या पोस्टमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी टाळलेला आहे. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच शिवाजी आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावरुनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या पोस्टमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो टाकणं टाळलं होतं. त्यानंतर या शुभेच्छांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आढळराव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मग काही तासांतच यू टर्न घेत, आढळराव पक्षातच असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र या कारवाईमुळे नाराज झालेले आढळराव काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. 


शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्टमध्ये बाळासाहेब आणि उद्धव या दोघांचाच फोटो

आता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आढळराव यांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यांनी ज्यांना नेतृत्व मानलं आहे त्या एकनाथ शिंदे यांचे फोटो टाकणं यावेळी टाळलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. तसंच एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर हे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन असणार आहे.

नव्याने पक्षबांधणी करण्याचं आवाहन
एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी, आमदार, खासदारांसह नगरसेवक,पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. एकीकडे एक-एक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना दुसरीकडे खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यातच नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ते राज्याचा दौरा करणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget