एक्स्प्लोर
बालेवाडीत रंगणार सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पारितोषिक सोहळा
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 3 तालुक्यांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा 30 तालुक्यांचा समावेश होता. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

पुणे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 3 तालुक्यांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा 30 तालुक्यांचा समावेश होता. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांचा आणि विजेत्यांच्या सन्मानासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीनं आज पुण्यातील बालेवाडीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी 5 वाजता या सोहळ्याला सुरूवात होईल. स्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, पानी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि 4 हजार गावांमधली ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/satyamevjayate/status/890861431595294720
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















