Saswad Crime news : गाडीवर विधानसभा सदस्य असल्याचं स्टिकर लावलं; पोलिसांकडून कारवाई
गाडीवर विधानसभा सदस्य असं स्टिकर लावणे बेकायदेशीर आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांनी क्रेटा गाडीवर आमदार स्टिकर लावल्याने कारवाई केली आहे.
![Saswad Crime news : गाडीवर विधानसभा सदस्य असल्याचं स्टिकर लावलं; पोलिसांकडून कारवाई Saswad Crime news A sticker was put on the car saying that it was a member of the Legislative Assembly Saswad Crime news : गाडीवर विधानसभा सदस्य असल्याचं स्टिकर लावलं; पोलिसांकडून कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/29b1d6af058ba7580d26191e4657c4231681555046673442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saswad Crime News : गाडीवर विधानसभा सदस्य असं स्टिकर (Crime) लावणे बेकायदेशीर आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांनी क्रेटा गाडीवर आमदार स्टिकर लावल्याने कारवाई केली आहे. पोलिसांना मागील काही दिवसापासून सासवड शहर आणि परिसरामध्ये काही चार चाकी वाहनावर एक गोलाकार स्टिकरवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले स्टिकर पोलिसांना दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचं ठरवलं.
पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता मात्र ती वाहने सापडली नव्हती. आज सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना एक क्रेटा गाडी मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली असता गाडीमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते. ही गाडी आमदारांच्या मालकीची देखील नव्हती. गाडीचे मालक ऋतुराज गायकवाड आहेत. ते काळेवाडीत राहतात. त्यांच्या क्रेटा गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आहे. शिवाय गाडीला ब्लॅक फिल्मिंग केलेले आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नव्हता. ही गाडी पोलीस स्टेशनला आणून गाडीचा लोगो जप्त केला.
दंड आकारला..
बेकायदेशील स्टिकर लावल्याने आणि ब्लॅक फिलमिंग केलेल्याने गाडी मालकावर कारवाई करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे 6500 रुपये दंड करण्यात आला आहे. कारवाई होईल असं कोणतंही कृत्य करु नको, असं आवाहन सासवड शहर आणि पुरंदर तालुक्यातील चार चाकी वाहनांच्या धारकांना पोलिसांनी केलं आहे. कोणीही अशा प्रकारचे लोगो गाडीवर लावण्यास मनाई आहे जर आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी विधानसभा सदस्य, आमदार आणि स्तंभ असलेली गाडी निदर्शनास आली होती. त्यामुळे या गाडीचा आम्ही शोध घेत होते. अनेकदा नाकाबंदीच्या दरम्यान अशा प्रकारच्या वाहनांचा पाठलाग केला. मात्र ही गाडी सापडत नव्हती. त्यामुळे आम्ही या गाडीचा चांगलाच शोध घेत असताना आज सकाळी ही गाडी सापडली आणि पोलीस ठाण्यात गाडी आणली आणि गाडी मालकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून दंड वसूल केला सोबतच लोगो जप्त केला आणि काळी फिल्मदेखील काढवी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)