माऊलींचे प्रस्थान तोंडावर, तरी इंद्रायणी फेसाळलेलीचं; संतापलेल्या वारकऱ्यांचा राजकीय नेत्यांना आळंदीत पाय न ठेऊ देण्याचा इशारा
पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय.
पुणे : आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान देणार, ही घोषणा करणारं सरकार वारकऱ्यांच्याच जीवाशी खेळतंय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये. संत ज्ञानेश्वर महाराजांचा (Sant Dnayneshwar Maharaj) पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, आजही इंद्रायणी नदी (Indrayani River) फेसाळलेली आहे. या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही, तर एका ही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार करु शकत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचंही बोललं जातंय. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावी लागणार आहे, यासाठी वारंवार मागणी करुनही सरकारकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलंय. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जातोय. इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या, या वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आलंय. त्यामुळं वारकरी, गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करतोय. याचअनुषंगाने आता इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिला आहे.
वारकऱ्यांमध्ये मोठा रोष
आळंदीतील इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे, यासाठी वारंवार मागणी करुनही सरकारकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलंय. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जातोय. पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे, परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे.
हे ही वाचा :