Sanjay Raut : बारामतीमध्ये धमक्या देता, मुंबईत यायचंय लक्षात ठेवा; इंदापुरातून राऊतांचा अजित पवारांना इशारा
Sanjay Raut on Ajit Pawar : धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे, असा इशारा संजय राऊत यांनी अजित पवार यांना दिला आहे.
Sanjay Raut : तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुध्दा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे. इंदापुरातील मविआच्या (Mahavikas Aghadi) प्रचार सभेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचाराने बसलेले आहात, मला अन्नद आहे की, इंदापूरला सुप्रिया ताईंच्या प्रचारासाठी मला येता आले. एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत आहे की, पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली, लोकं आपल्याला स्वीकारणार नाहीत. त्याचे भय वाटायला लागले की, मोदींचा मार्ग सुरु होतो, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
नामर्द होते ते पळून गेले
धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. आम्हाला माहित आहे आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे. ही मर्दांची सभा, नामर्द होते ते पळून गेले, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे. आताही प्रचाराची गरज नाही. बारामतीचे गुजरात करू पाहत असाल तर इथे शिवसेनेचा झेंडा असेल. धमक्या देऊन मत मागतात त्यांनी विकास केला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते आहे. ते म्हणाले मी पुन्हा आलो आणि दोन दोन पक्ष घेऊन आलो. काय हे क्वालिफिकेशन, लोक विकास करून येतात. मी त्यांना सांगतो चार महिन्यात सरकार बदललेले असेल. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार नसेल. ईडी आणि सीबीआय आहेत. त्या काही दिवसांनी आमच्याकडे येणार आहेत. तुमचा पक्ष शिल्लक राहतो का ते बघा, असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता जाणवते
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीतील माणूस म्हणायच्या लायक नाहीत. हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता जाणवते. या देशात दोन लोकांना झोप लागते. त्यांना गुजरातला पाठवू तिथे त्यांना शांत झोप लागेल. नाहीतर जिथे केजरीवाल आणि सोरेन किंवा आम्ही जिथे राहिले तिथं पाठवू त्यांना शांत झोप लागेल,
भारताचा आधार शरद पवारांच्या रूपाने बारामतीत
कांद्याला, दुधाला भाव नाही, भाव आमदाराला आहे. आम्हाला अच्छे दिन नकोय. आम्हाला 2014 च्या आधीचे दिवस हवे आहेत. अजित पवार गेल्याने झाडाचे पान देखील हलले नाही. एकनाथ शिंदे गेल्याने शिवसेना मजबूत झाली. जे महाविकास आघाडीला सोडून गेले त्यांना जनता जागा दाखवेल. आजही लोकांना वाटत की, शरद पवार कृषी मंत्री आहेत. या भारताचा आधार शरद पवारांच्या रूपाने बारामतीत आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
आणखी वाचा