एक्स्प्लोर
पुण्यातील अँबी व्हॅली आजपासून पूर्णपणे ठप्प
अँबी व्हॅलीमध्ये एक इंटरनॅशनल स्कूल आहे, ज्यामध्ये साठ ते सत्तर विद्यार्थी शिकतात ते स्कूल मात्र सुरु ठेवले जाईल.

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अँबी व्हॅली आजपासून पूर्णपणे ठप्प झाली. सर्वोच्च न्यायालयाने अँबी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले. त्यानंतर अँबी व्हॅलीच्या डायरेक्टर बोर्डाला अँबी व्हॅली चालवणं अवघड जात होतं.
अँबी व्हॅलीच्या उत्पन्नातून येणारा नफा लिक्विडेटरकडे जमा करावा लागत होता. त्यामुळे अँबी व्हॅलीतील कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार होऊ शकलेला नाही. त्यामुळे अँबी व्हॅलीच्या डायरेक्टर बोर्डाने अँबी व्हॅलीत काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी सोळाशे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला उरलेले 924 कामगार हे अँबी व्हॅलीमुळे बाधित झालेल्या गावांमधील आहेत आणि त्यांना पुढील पंधरा दिवसांचा पगार दिला जाईल. त्यानंतर 19 ऑक्टोबरला अँबी व्याली पूर्णपणे बंद होईल. मात्र ज्या लोकांच्या अँबी व्हॅलीमध्ये खाजगी मालमत्ता आहेत ते लोक अँबी व्हॅलीमध्ये येऊ शकतील.
अँबी व्हॅलीमध्ये एक इंटरनॅशनल स्कूल आहे, ज्यामध्ये साठ ते सत्तर विद्यार्थी शिकतात ते स्कूल मात्र सुरु ठेवले जाईल.
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रोतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाच्या आठ हजार एकरहून अधिक जागेत पसरलेल्या अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला आणि मुंबई उच्च न्यायालयाला त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लिक्विडेटरने काम सुरु केले.
आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अँबी व्हॅलीच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अँबी व्हॅलीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय जो बुधवारीही कायम असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
