एक्स्प्लोर

रुपाली चाकणकरांनी आम्हाला खोट्या आरोपात फसवले, संभाजी ब्रिगेडच्या प्रदीप कानसेंचा दावा

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खोट्या आरोपांमध्ये आम्हाला फसवले आहे. आम्ही कुठल्याही अश्लील टिप्पण्या केल्या नव्हत्,या असं संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेश संघटक प्रदीप कानसे (Pradeep Kanse) यांनी सांगितलं.

पुणे : "राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खोट्या आरोपांमध्ये आम्हाला फसवले आहे. आम्ही कुठल्याही अश्लील टिप्पण्या केल्या नव्हत्या" असं संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेश संघटक प्रदीप कानसे (Pradeep Kanse) यांनी सांगितलं. ते एबीपी माझाशी बोलत होते. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल प्रदीप कानसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत प्रदीप कानसे हे आपली भूमिका मांडत आहेत. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना रुपाली चाकणकर यांचे आरोप फेटाळून लावले.

 "आम्ही स्त्रियांचा आदर करतो, जय जिजाऊ म्हणत आम्ही बोलायला सुरुवात करतो. आमचा आक्षेप रुपाली चाकणकर यांनी केलेल्या पोस्टवर होता. वामन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवतो अशी पोस्ट त्यांनी दिवाळी मध्ये केली होती. त्यावर आमचा आक्षेप आहे, त्यांनी मला अडकवले आहे. माझी बदनामी केली आहे. रुपाली चाकणकर पदाचा फायदा घेतात, लोकांवर दबाव टाकतात, अन्याय करतात", असा आरोप प्रदीप कानसे यांनी केला. 

नेमकं प्रकरण काय? 

रूपाली चाकणकर यांनी दिवाळीत बळी राजाच्या डोक्यावर पाय ठेवणाऱ्या वामनाचे चित्र पोस्ट केले होते. हे संकल्प चित्र बळीराजाबद्दलच्या ऐतिहासिक तथ्यांवर अन्याय करणारे असल्याचा दावा प्रदीप कानसे यांनी केला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला.  मात्र आपण रुपाली चाकणकर यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह लिखाण केले नाही असा दावा प्रदीप कणसे यांनी केला. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींचा आणि आपला कोणताही संबंध नसल्याचेही प्रदीप कणसे यांनी म्हटलं आहे. 

चार जण ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर  यांच्याविषयी समाजमाध्यमात  अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतलं. 

रुपाली चाकणकर यांच्या बाबतीतील अश्लील  पोस्ट विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील  यांनी फेसबुकवर शेअर केली होती. या चौघांवर पुणे सायबर पोलीस ठाण्यात आयपीसी 354 (अ) आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे  यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यातील संशयित असलेल्या  जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे आणि अमोल पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून, त्यांचे मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी मिळवले.

पोलिसांकडून धरपकड

त्याआधारे पोलीस पोलिसांनी जयंत रामचंद्र पाटील या सांगली जिल्ह्यातील  धनगरवाडीत राहणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचले . त्याला ताब्यात घेतले असता तपसादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस  देऊन त्याचा जबाब नोंदवून मोबाईल जप्त केला.

तसेच सोशल मीडिया पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केलेल्या फेसबुक युजर  नावाचे अकाऊंट असलेल्या संशयित व्यक्तीची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे वय-34 रा. रहाटी, ता.जि. परभणी याचा शोध घेतला असता, आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

याशिवाय फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करण्यात आली होती. पोलिसांनी हे फेसबुक अकाऊट वापरणाऱ्या संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याला देखील सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस दिली. सायबर पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लिल पोस्ट करणाऱ्या
आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढून गुन्हा उघडकीस आणला. 

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget