एक्स्प्लोर

'खोट्या फाईल काढून खडसेंना आत टाकण्याचा प्लॅन', रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Rohit Pawar : भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

Rohit Pawar पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची लवकरच भाजपमध्ये (BJP) घरवापसी होणार आहे. यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.  

रोहित पवार म्हणाले की,  मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. नेत्यांना भीती दाखवली जात आहे.  खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे. 

फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरलेत

ते पुढे म्हणाले की, फडणवीस साहेब आता वैतागले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी होत आहे. फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

माने मनातून गेले की त्यांना मारून नेलं हे बघावं लागेल

प्रवीण माने (pravin Mane) हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, प्रवीण माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांची खूप मोठी संपत्ती आहे. त्यामुळे माने मनातून गेले की त्यांना मारून नेलं हे बघावं लागेल. नेते गेले मात्र लोक आपल्यासोबत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे तीन लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रोहित पवारांचे प्रदीप गारटकरांवर टीकास्त्र

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. रोहित पवारांचे शिक्षण इंदापूरमध्ये झाले, कारण बारामतीत शिक्षणाची सोय नव्हती. दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळूनही बारामतीचा विकास होऊ शकला नाही, असे त्यांनी म्हटले. यावर रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, अर्धवट माहिती आहे. त्यांना काय माहिती मी कुठं शिकलो. अजित दादांनी सांगितली होत की, मी संघर्ष केला नाही. मी भारताबाहेर शिकलो नाही. त्यावेळी आमच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. मला बाहेर शिकायला जाता आलं नाही. मी अनुभवातून शिकलो आहे. ते आता झोपेतून उठले आहेत. त्यांचं विधान हास्यास्पद आहे. लहान मुलासारखे वक्तव्य ते करत असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. 

आणखी वाचा 

माझ्याकडे ना कारखाना, ना बँक, ना सोसायटी, मला ना ईडीची भीती ना सीबीआयची, प्रणिती शिंदेंची सोलापुरात आर-पारची लढाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaRanveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special ReportSomnath Suryawanshi Case |  सुरेश धस यांचा दुटप्पीपणा, विरोधकांचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Embed widget