एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एकीकडे एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी, दुसरीकडे कन्या रोहिणी खडसे उद्या शरद पवारांच्या भेटीला, रावेरचा उमेदवार ठरणार?

Rohini Khadse : एकीकडे एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होत असताना त्यांच्या कन्या रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची भेट घेणार आहे. उद्या रावेर मतदारसंघासाठी शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

Rohini Khadse : एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या 15 दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. तर दुसरीकडे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात भेट घेणार आहेत. 

भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शरद पवार गटाकडून अद्याप रक्षा खडसे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. रक्षा खडसे यांच्या विरोधात रावेर मध्ये तोडीस तोड उमेदवार शोधण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवरच रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची भेट घेणार आहेत. 

रावेर लोकसभेचा उमेदवार उद्या निश्चित होणार? 

उद्या पुण्यात रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच रोहिणी खडसे यांची पुण्यात पत्रकार परिषद देखील होणार आहे. 

 रोहिणी खडसे उद्या काय बोलणार? 

रावेर मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासह जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित असतील. रावेरमधून नेमकं शरद पवार कुणाला मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच पत्रकार परिषदेत रोहिणी खडसे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

...म्हणून मी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करतोय : एकनाथ खडसे

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी येत्या 15 दिवसात भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. भाजप हे माझे घर आहे. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये (BJP) होतो. काही नाराजीमुळे मी बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाली. म्हणून मी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती पाहता मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितली आहे. त्यांची अनुकूलता पाहून भाजपमधे जाण्याचा मी निर्णय घेतल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

'खोट्या फाईल काढून खडसेंना आत टाकण्याचा प्लॅन', रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी : 'या' एका अटीवर खडसेंची घरवापसी; शरद पवारांना धक्का देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडलेSpecial Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचZero Hour : दिल्लीत बैठक, खातेवाटपावर चर्चा, देवेंद्र फडणीसांच्या जमेच्या बाजू कोणत्या?Zero Hour Media Center : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ठाकरे स्वबळावर लढतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget