एक्स्प्लोर

एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात : पुणे पोलीस

पुण्यातील शनिवारवाडा इथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात होता, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी दिली.

पुणे: पुण्यातील शनिवारवाडा इथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात आणि पैसा होता, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी दिली. इतकंच नाही तर काल अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळेंसह पाचही जणांचा प्रतिबंधीत नक्षलवादी/माओवादी संघटनांशी संबध आहे, त्याचे पुरावे आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं. मात्र भीमा कोरेगाव हिंसाचारात या पाच जणांचा सहभाग होता का, हे अजून सिद्ध झालेलं नाही, त्याचा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. माओवाद्यांचा पैसा एल्गारच्या आयोजनात वापरला गेला, त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत, असं पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आरोपींचे धागेदोरे माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी जोडलेले आहेत हे तपासात स्पष्ट झालं, असंही त्यांनी सांगितलं. एल्गार परिषदेच्या आयोजनामधे अनेक संघटनांचा सहभाग होता. याचा अर्थ सर्वांचा माओवाद्यांशी संबंध आहे असं नाही, असं पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी स्पष्ट भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पोलिसांचं धाडसत्र, मग भिडेंना अटक का नाही?, मुख्यमंत्र्यांचं उत्तर...  रोना विल्सन यांच्या घरातून पोलिसांनी पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क आणि काही कागदपत्र जप्त केली असून, ती फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे सुरेंद्र गडलिंग यांच्याकडं असलेल्या संगणकाची हार्ड डिस्क आणि रोना विल्सनकडील लॅपटॉपमधील हार्ड डिस्कच्या फॉरेन्सिक क्लोन कॉपीजची छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये या दोघांजवळही सीपीआय माओवादी या प्रतिबंधीत संघटनेसोबत घनिष्ठ संबंध दर्शवणारे दस्तऐवज प्राप्त झाले. तसेच या दोघांचेही एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासोबत संबंध आढळून आले. माओवाद्यांचा पैसा एल्गार परिषदेसाठी वापरण्यात आला. नागपूरमधील शोमा सेन आणि महेश राऊत यांचेही माओवाद्यांशी संबंध दिसून आले. एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये माओवाद्यांशी संबंध असलेले लोक होते असं आमचा तपास सांगतो,  मात्र दुसऱ्या दिवशी कोरेगाव- भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत ठरली असं आम्ही म्हटलेलं नाही. हा तपासाचा भाग आहे. रोना विल्सनच्या कॉम्प्युटरमधून एक लेटर मिळालं आहे. माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने हे लेटर जानेवारी महिन्यात रोना विल्सनला लिहलं आहे. या लेटरमध्ये एल्गार परिषद यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. या लेटरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे काही नेते आपल्या कामात आपल्याला मदत करतायत असं सांगण्यात आलं आहे. एल्गार परिषद कोरेगाव-भीमाच्या लढ्याला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचचे चार जण, तर रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संबंधित बातम्या 

एल्गार परिषद प्रकरणी सुधीर ढवळेंसह 5 जणांना अटक  

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल    

पोलिसांचं धाडसत्र, मग भिडेंना अटक का नाही?, मुख्यमंत्र्यांचं उत्तर...   

एल्गार परिषदेनंतर कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरवर धाडी   

पुण्यातील ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena Eknath Shinde List : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधीMuddyach Bola : कल्याण-डोंबिवलीत कुणाची हवा? अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोलाZero Hour : मविआ-महायुतीच्या जागावाटपाचा गोंधळ ते पुण्यात सापडलेले 5 कोटी,सविस्तर चर्चाZero Hour : ब्रिक्सची परिषदेत भेट, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
Embed widget