एक्स्प्लोर

स्वाभिमानीने नातं तोडल्यानंतर रविकांत तुपकरांनी नवा पक्ष काढला, महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी विधानसभेच्या 25 जागा लढणार

Ravikant Tupkar: आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे.

पुणे: शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Farmers Sanghatna) हाकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आलं. त्यानंतर आज रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर 25 जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत रविकांत तुपकरांनी ही घोषणा केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, परवा जो धक्कादायक निर्णय स्वाभिमानीने माझा बाबत घेतला, संघटनेपासून मला वेगळं केलं, राजू शेट्टी यांची जी भूमिका होती ती ऐकून मला धक्का बसला. आज 4 तास आमची चर्चा केली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक वेळा मी जेल मध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नाव रूपाला आली आणि माझी गरज संपली.

त्याचबरोबर रविकांत तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्यचं संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितलं होतं. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, जालिंदर पाटील यांच्या आरोपाला उत्तर देणे मला बंधनकारक आहे. लालबिल्ला तळ हाताच्या फोडासारखा सांभाळला आहे.

काय म्हणाले होते जालिंदर पाटील?

"लोकसभा निवडणूक तुपकर यांनी पक्षाच्या वतीनं लढवणं अपेक्षित होतं, तरीही ते अपक्ष म्हणून लढले. तरीही स्वाभिमानीचा एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करणं सुरूच ठेवलं होतं. ते मागील तीन ऊस परिषदेसह अन्य कोणत्याही कार्यक्रमला उपस्थिती राहिलेले नाहीत. तुपकर सातत्यानं पक्ष विरोधी कृत्ये करत आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शिस्त पालन समितीसमोर उपस्थितीत राहून आपलं म्हणणं मांडण्याची नोटीस काढली होती. पण, ते शिस्त पालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी परस्पर विधानसभेला विदर्भातील सहा जागा लढविण्याची घोषणादेखील केली.", स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले. 

"आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्ष आणि संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही", असं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget