Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे.
रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri- sindhudurga Loksabha election ) लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan rane) यांच्या विजयासाठी भाजपकडून जोरदार (Maharashtra BJP) रणनीती आखली जात आहे. त्यांना विजयी करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. प्रचारसभा, रोड शो आणि कोपरा सभेसोबतच एक पाऊल पुढे जात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपाने निवडणूक निरीक्षक जाहीर केले आहेत.
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये आमदार, माजी मंत्री, खासदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
या पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांनी 25 एप्रिल ते 5 मे या कालावधीत ते मतदारसंघात पूर्णवेळ मुक्कामी जाऊन प्रत्येक बूथ विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा, याकरिता हे सर्वजण मार्गदर्शन करणार आहेत. निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
चिपळूण विधानसभेसाठी नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते, रत्नागिरीसाठी राळेगाव विधानसभेचे आमदार, माजी मंत्री अशोक उईके, राजापूरसाठी विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांची निवड जाहीर केली आहे. तसेच कणकवली विधानसभेसाठी गडचिरोली-चिमुरचे खासदार अशोक नेते, कुडाळसाठी वर्ध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सावंतवाडीकरिता अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच रायगड, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, बारामती, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातार , माढा, सोलापूर या मतदार संघातदेखील उमेदावारांना विजयी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या सगळ्या मतदार संघात निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांच्यासोबतच प्रत्येकी सहा जणांनीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या मतदारसंघात कोणाची नियुक्ती?
रायगड - प्रविण दरेकर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - रविंद्र चव्हाण
धाराशिव - अजित गोपछडे
लातूर- प्रताप पाटील चिखलीकर
बारामती - मेधा कुलकर्णी
कोल्हापूर -धनंजय महाडिक
हातकणंगले- अनिल बोंडे
सांगली- भागवत कराड
सातारा- विक्रांत पाटील
माढा- प्रसाद लाड
सोलापूर- श्रीकांत भारतीय
इतर महत्वाची बातमी-