एक्स्प्लोर

Ranjitsinh Mohite Patil : माढ्याचे रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कुणीकडे? कुटुंब शरद पवार गटात तर रणजितसिंहांची भाजपच्या अधिवेशनाला हजेरी

Ranjitsinh Mohite Patil : भाजपच्या अधिवेशनाला आज विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील देखील दिसून आले, त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात ते नेमके कोणाकडे आहेत अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

पुणे: आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह (Amit Shah) हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे जवळपास 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी अनेक नेते उपस्थित आहेत मात्र या सर्व घडामोडींमध्ये विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) देखील दिसून आले, त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात ते नेमके कोणाकडे आहेत अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या अधिवेशनाला रणजितसिंह यांची हजेरी

नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये संपुर्ण मोहिते पाटील कुटूंब राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात गेल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे भाजपच्या कोट्यातून आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्ये असल्याचं दिसून येत आहे. आज पुण्यात पार पडणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाला रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सक्रीय न राहता मुकप्रचार करत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मदत केली होती, अशा चर्चा देखील सुरू होत्या. अशातच राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या भाजपच्या बैठकांना ते उपस्थित राहात असल्याने राजकीय वर्तुळात विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) नेमकं कुणीकडे आहेत अशा चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर ते आगामी विधानसभेला नेमकं कुठं राहणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात तर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

लोकसभा निवडणुकीवेळी माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील घराण्याला डावलून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना मैदानात उतरवलं होतं. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाराजीतून भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय देखील मिळवला. दरम्यान, या सर्व घडामोडींपासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपूत्र आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) पाटील दूरच राहिल्याचं दिसून आलं. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident news: मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident news: मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Pune Police Ayush Komkar: पुणे पोलीस आता आंदेकर गँगचं कंबरडं मोडणार, सगळीकडून समूळ नायनाट करणार, नेमकं काय झालं?
पुणे पोलीस आता आंदेकर गँगचं कंबरडं मोडणार, हितचिंतकांचाही समूळ नायनाट करणार, नेमकं काय झालं?
Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
Nashik Accident : राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
Pune Crime Ayush Komkar: डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
Embed widget