![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
QR Code Scam : कुठेही QR Code स्कॅन करत असाल, तर थांबा; एक चुकीचा QR Code Scan केल्यानं खिसा रिकामा होऊ शकतो!
क्युआर कोड स्कॅन करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. सध्य़ा सगळीकडे सायबर भामटे कधी आणि कोणत्या बाबतीत फ्रॉड करतील याचा काही नेम नाही त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना नक्की काळजी घ्या...
![QR Code Scam : कुठेही QR Code स्कॅन करत असाल, तर थांबा; एक चुकीचा QR Code Scan केल्यानं खिसा रिकामा होऊ शकतो! qr code scam how to identify this-scam if you make a mistake it wont take long for your account to be emptied QR Code Scam : कुठेही QR Code स्कॅन करत असाल, तर थांबा; एक चुकीचा QR Code Scan केल्यानं खिसा रिकामा होऊ शकतो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/1d7bc9bae71133f2a4db54f617ab61691701841849401442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
QR Code Scam : सध्या सगळीकडे आपण क्युआर कोडा वापर करतो. पट्रोल पंप असूदेकिंवा हॉटेलचा मेन्यू पाहण्यासाठी असूदे तेट क्युआर कोड स्कॅन करतो आणि मेन्यू चेक करत असतो. मात्र हाच क्युआर कोड स्कॅन करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. सध्य़ा सगळीकडे सायबर भामटे कधी आणि कोणत्या बाबतीत फ्रॉड करतील याचा काही नेम नाही त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना नक्की काळजी घ्या नाहीतर तुमची आयुष्यभराची कमाई सायबर भामट्याच्या खिशात जाऊ शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगीही अशाच प्रकारच्या ऑनलाइन घोटाळ्याची शिकार झाल्याची बातमी नुकतीच माध्यमांनी दिली होती. ज्यामध्ये त्याने ऑनलाइन सेकंड हँड मार्केटप्लेसवर जुना सोफा सेट विकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बदल्यात त्याने 34 हजार रुपये गमावले. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. येथे आम्ही तुम्हाला क्यूआर कोड स्कॅमची पद्धत आणि ते टाळण्याच्या टिप्स सांगत आहोत.
क्यूआर कोड घोटाळा कसा होतो?
जेव्हा कोणी ऑनलाइन विक्री वेबसाइटवर एखादी वस्तू टाकते तेव्हा हा घोटाळा सुरू होतो. जेव्हा फसवणूक करणारे स्वतःला खरेदीदार म्हणून सादर करतात आणि आगाऊ किंवा टोकन रक्कम भरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करायला सांगतात. स्कॅमर्स स्कॅनिंग करून पैसे मिळण्याची माहिती देतात. युजर्स हा क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून पैसे कापले जातात.
क्यूआर कोड घोटाळा कसा ओळखावा?
घोटाळा ओळखण्यासाठी सुरुवातीला स्कॅन करणाऱ्या व्यक्ती माहित असणे आवश्यक आहे की क्यूआर कोड केवळ पैसे पाठविण्यासाठी स्कॅन केला जातो, पैसे प्राप्त करण्यासाठी नाही. हा घोटाळा ओळखण्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्यामध्ये आपण क्यूआर कोड किंवा बनावट वेबसाइट ओळखू शकता. जर एखादी वेबसाइट "https://" पासून सुरू होत नसेल आणि वेबसाइटच्या नावात स्पेलिंगची चूक असेल तर तुम्हाला समजते की ती बनावट वेबसाइट आहे. त्यामुळे स्कॅन करताना वेबसाईटचीदेखील माहिती घेणं आवश्यक आहे.
क्यूआर कोड घोटाळे कसे टाळावे?
क्यूआर कोड घोटाळे टाळण्यासाठी यूपीआय आयडी आणि बँक डिटेल्स अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करणे टाळा. ऑनलाइन व्यवहारांची पडताळणी करा आणि संशयास्पद क्यूआर कोडपासून सावधगिरी बाळगा. नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)