Pune Lonavala Mega Block :पुणे-लोणावळा मार्गावर 18 फेब्रुवारीला मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून घ्या!
पुणे-लोणावळा मार्गावरब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच 18 फेब्रुवारीला मध्य रेल्वे, पुणे विभागातर्फे पुणे-लोणावळा मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे
पुणे : पुणे -लोणावळा लोकलने (pune railway)प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-लोणावळा (lonavala) मार्गावर ब्लॉक Pune Lonavala Local Block) घेण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच 18 फेब्रुवारीला मध्य रेल्वे, पुणे विभागातर्फे पुणे-लोणावळा मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक (Pune Lonavala Local) घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या गैरसोयीसाठी खेद व्यक्त केली आहे.
कोणत्या गाड्या रद्द?
01562 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 9.57 रद्द
01564 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 11.17 वाजता रद्द
01592 शिवाजी नगर- लोणावळा लोकल शिवाजीनगर येथून सुटणारी दुपारी 12.05 वाजताची लोकल रद्द
01566 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 15.00 वाजताची लोकल रद्द
01588 शिवाजी नगर- तळेगाव लोकल शिवाजीनगर येथून 15.47 वाजताची लोकल रद्द
01568 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 16.25 वाजताची लोकल रद्द
01570 शिवाजी नगर- लोणावळा लोकल पुण्याहून 17.20 वाजताची लोकल रद्द
01559 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी 10.05 वाजताची लोकल रद्द
01591 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी 11.30 वाजताची लोकल रद्द
01561 लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून 14.50 वाजताची लोकल रद्द
01589 तळेगाव-पुणे-लोकल तळेगावहून 16.40 वाजताची लोकल रद्द
01565 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून 17.03 वाजताची लोकल रद्द
01567 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून 18.08 वाजताची लोकल रद्द
01569 लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून 19.00 वाजताची लोकल रद्द
एमजीआर चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12164 3.30 तास नियमित राहील. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे मेंटेनन्स मेगाब्लॉक महत्त्वाचे आहेत. यावेळी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही गैरसोय झाल्यास प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
लोकल प्रवाशांची मोठी संख्या
पुणे आणि लोणावळा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो प्रवासी या लोकलने प्रवास करत असतात. अनेकांना हा प्रवास सोयीचा ठरतो. त्यासोबत लोकलच्या वेळादेखील प्रवाशांच्या सोयीनुसार करण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी या लोकलने प्रवास करतात. पिक अवर्समध्ये या लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळते. मात्र लोकलची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत नाही. मात्र आता एक दिवसाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीचं काम करण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-