एक्स्प्लोर

Pune Weather News : पुणेकरांच्या जीवाची लाहीलाही; पुण्यात हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद, कोरेगाव पार्कमध्ये 43.4 अंश सेल्सिअस

पुण्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. या तापमानामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहे. पुण्यात यंदाच्या हंगामात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे.

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच (PuNe Weather Update) वाढ झाली आहे. या तापमानामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहे. पुण्यात यंदाच्या हंगामात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 43.1 तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे पुणेकरांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. काम नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, भरपूर पाणी पित रहा, अशा सूचना हवामान खात्याकडून पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.  

ढमढेरे येथे सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क येथे 43.4 अंश सेल्सिअस, शिरूर येथे 43.1 अंश सेल्सिअस आणि वडगाव शेरी येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 18 एप्रिल रोजी शिवाजीनगर येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर 28 एप्रिल रोजी  41.3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. सध्याचे तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने वाढलं आहे.

पुण्यातील तापमानाची पातळी वाढण्यामागचे कारण सांगताना भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) पुणे येथील हवामान व अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, 'कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुजरातमधून उष्ण हवा येत आहे. या भागात यंदा चांगला पाऊस झाला नाही, मान्सूनपूर्व पाऊसही पुरेसा झाला नाही, परिणामी जमीन कोरडी पडली असून ती अधिक तापत आहे. याव्यतिरिक्त, मध्यम अल निनोचा प्रभाव आहे. 

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत तापमानात सरासरीपेक्षा कमी तर कोकणआणि संपूर्ण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर (34.1 अंश सेल्सिअस) वगळता जवळपास सर्वच स्थानकांवर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले. सोलापुरात राज्यात सर्वाधिक 43.7 अंश सेल्सिअस तर महाबळेश्वरयेथे सर्वात कमी 22 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

 आरोग्य विभागाच्या विशेष सूचना जारी

-जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या वेळाने पाणी प्या
 -प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
 -ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
-टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली -हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
-पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
-तुमचे डोके झाकून ठेवाः थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपीचा वापर करा
-उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
 -हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
 -दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे.  थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.

इतर महत्वाची बातमी-

PM Modi in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे वाहतुकीत बदल, हे रस्ते राहणार बंद

PM Narendra Modi Pagadi : चांदीच्या कोयऱ्या अन् डायमंडचा सूर्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यात खास 'दिग्विजय योद्धा पगडी'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget