एक्स्प्लोर

Pune Tomato News : काय सांगता? पुण्यातून चक्क टोमॅटोची चोरी; शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

सोन्याची किंमत असलेले टोमॅटो चोरी गेल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य  व्यक्त केलं जात आहे.

Pune Tomato News :  आतापर्यंत आपल्यातील अनेकांनी वेगवेगळ्या (Tomato ) मौल्यवाण वस्तू चोरी गेल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र आता चक्क सोन्याची किंमत असलेले टोमॅटो चोरी गेल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य  व्यक्त केलं जात आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे 20 कॅरेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी टोमॅटो तोडून विकण्यासाठी कॅरेटमध्ये ठेवले होते. अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. या प्रकरणी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार  दाखल करण्यात आली आहे. ढोमे यांनी मोठ्या हिमतीने टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी तोडणीलादेखील पैसे लावले. त्यानंतर त्यांनी बाजारात विकण्यासाठी नेण्यासाठी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी आणि कॅरेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले होते.

टॉमेटो चोरीची थेट पोलिसांत तक्रार

मात्र दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले कॅरेट गायब झाले होते. हे पाहून त्यांना धक्का बसला. या प्रकाराची त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि  घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी  शिरूर तालुक्यातील बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदि परिसरातून शेतकऱ्यांशी निगडीत कृषीपंप, ठिबकसंच, केबलचोरी, कृषीयंत्र चोरी अशा स्वरूपाच्या अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहे. 

काही शेतकरी तोट्यात तर काही करोडपती...

मे महिन्यात टोमॅटोला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. परिणामी त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचं धाडस केलं नाही. मागील पिकांचं नुकसान अजूनही भरुन निघालं नाही आहे. मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांनी धाडस करुन टोमॅटोची लागवड केली आणि आता टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी लखपती आणि करोडपती झाले आहे. जुन्नरमधील तुकाराम गायकर या  शेतकऱ्यांने18 एकरात टोमॅटोची लागवड केली होती. ते टोमॅटोंमुळे करोडपती झाले आहेत. 

 

हेही वाचा-

Tomato Farmer: आधी रडवलं अन् आता करोडपती केलं; टोमॅटोमुळे जुन्नरचा शेतकरी झाला करोडपती

 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Embed widget