एक्स्प्लोर
कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये पुण्याची श्रुती देशात पहिली!
कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या स्पर्धा परीक्षेत पुण्यातील श्रुती श्रीखंडे या विद्यार्थिनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
पुणे : कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या स्पर्धा परीक्षेत पुण्यातील श्रुती श्रीखंडे या विद्यार्थिनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
यूपीएससीच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काल (गुरुवार) जाहीर झाला. त्यात मराठमोळ्या श्रुतीनं देशातून अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. श्रुती पुण्यात ILS लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ती पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे.
श्रुतीचे वडील विनोद श्रीखंडे हे भारतीय लष्करात ब्रिगेडियर आहेत आणि त्यांच्याकडूनच आपल्याला प्रेरणा मिळाली. असंही श्रुतीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
या परीक्षेत देशभरातून 232 विद्यार्थी पात्र झाले आहेत. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता अव्वल आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
नागपूर
Advertisement