एक्स्प्लोर

Pune Ink Attack: मोठी बातमी: कोर्टाबाहेर भावनांचा उद्रेक, विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न, वातावरण तापलं

Pune News: शिवाजीनगर न्यायालयाबाहेर शाईफेकीचा प्रयत्न झाला. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला.

पुणे: कल्याणीनगर अपघातप्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला आज पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच पुण्यात भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर (Vishal Agrawal) शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला.  विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात (Ink Attack) आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला.  वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचललं. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या हल्ल्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या सगळ्यांचे हात काळ्या शाईने बरबटले होते. त्यांनी सांगितली की, आम्ही विशाल अग्रवालच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर शाई पडली. पण नंतर तो पोलिसांमुळे बचावला. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातासाठी विशाल अग्रवाल हा त्याच्या मुलापेक्षा अधिक जबाबदार आहे. पुण्यातील पबवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे. आम्ही याठिकाणी विशाल अगरवालला धडा शिकवण्यासाठी आलो होतो. त्याच्या मुलाने दोन निष्पापांचे जीव घेतले आहेत. विशाल अग्रवाल याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

अल्पवयीन मुलासंदर्भात बालहक्क न्यायालय निकाल देणार

या अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विशाल अग्रवालच्या मुलाला बुधवारी सकाळी बालहक्क न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्या वकिलांनी कोर्टासमोर बाजू मांडली. माझा अशील अल्पवयीन आहे, याचा विचार करुन त्याच्याबाबत शिक्षेचा निर्णय घ्यावा, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडताना अल्पवयीन मुलावरील आरोपांचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आता दुपारी साडेचार वाजता बालहक्क न्यायालय निकाल देईल. या निकालात काय असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 

विशाल अग्रवालसाठी कोर्टात वकिलांची फौज

पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर केले आहे. अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक  करण्यात आली होती . विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासह वकिलांचा मोठी फौज कोर्टात दाखल झाली आहे. विशाल अग्रवाल यांच्यासह नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांच्या विरोधात  सुनावणी होणार आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी कोर्टात धनिकपुत्राच्या वकिलांनी काय सांगितलं, वाचा स्टार्ट टू एन्ड युक्तिवाद

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
Sunetra Pawar on Finance Ministry: अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
Pune News: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain White Line Controversy MNS: पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Urmila Matondkar Ex-Husband Mohsin Akhtar Married Again: घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
Embed widget