एक्स्प्लोर

मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी कोर्टात धनिकपुत्राच्या वकिलांनी काय सांगितलं, वाचा स्टार्ट टू एन्ड युक्तिवाद

Pune Accident : पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला आज पुन्हा एकदा बालहक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

Pune Porsche Car Accident : पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील (Pune Hit And Run Case) अल्पवयीन आरोपीला आज पुन्हा नव्यानं पुणे पोलिसांनी (Pune Police) बालहक्क न्यायालयात हजर केलं. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला यापूर्वी कोर्टानं काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केलेला. त्यानंतर राज्यासह देशभरातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल केला असून पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

कोर्टात नेमकं काय-काय घडलं? 

पुणे पोलिसांकडून कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलं आहे. अपघातावेळी हा मुलगा दारू प्यायला होता, हे न्यायालयाला पटवून देण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करतायत. पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात कलम 185 ची वाढ केली आहे. त्याद्वारे हा मुलगा दारुच्या नशेत होता, हे सांगण्याचा पुणे पोलीस न्यायालयासमोर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांकडून या अल्पवयीन मुलानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचं बील ज्युविनाईल कोर्टासमोर सादर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये या मुलानं दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हा मुलगा दारू पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलं आहे. मात्र, हा मुलगा दारू प्यायलेला होता की नाही, यासाठी सर्वात भक्कम पुरावा ब्लड सॅपलचाच असेल. 

पुणे अल्पवयीन आरोपीच्या वकिलांनी त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची बाजू मांडली. त्याच्या वकिलांची बाजू मांडल्यानंतर सरकारी वकीलांनी पोलिसांची बाजू मांडली. पुणे पोलिसांतर्फे सरकारी वकीलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सरकरी वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद संपल्यानंतर साडेचार वाजता ज्युवीनाईल कोर्ट निर्णय देणार आहे. 

यापूर्वी अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पोलिसांनी नव्यानं 185 कलम दाखल कर आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष लागलं आहे. 

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालहक्क न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. आज पुन्हा नव्यानं त्याच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यावेळी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये नव्यानं 185 कलम दाखल करण्यात आलं आहे. या कलमांतर्गत अल्पवयीन आरोपी दारू पिऊन तो वाहन चालवत होता आणि त्याचवेळी त्याच्या हातून अपघात झाला आहे, अशी तरतूद आहे. 

योग्य कलम लावण्यात पोलिसांकडून दिरंगाई? 

याआधी ज्यावेळी पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी 304 कलम लावलं होतं. या कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यासाठी आवश्यक ते कलम लावलं गेलं नव्हतं. तसेच, आवश्यक ते पुरावेही देण्यात आलेले नव्हते. माध्यमांना माहिती देताना पुणे पोलिसांनी सांगितलं होतं की, आरोपी अल्पवयीन असून तो मद्यधुंद अवस्थेत होता, पण पोलिसांनी न्यायालयात मात्र, त्यासाठी आवश्यक पुरावे दिलेले नव्हते. त्यानंतर याप्रकरणी संपूर्ण राज्यासह देशभरातून रोष व्यक्त होत होता. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा नव्यानं 185 कलम दाखल करत आरोपीला नव्यानं बालहक्क न्यायालयात हजर करण्यात आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget