एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Weather Updates :  पुण्यात दोन दिवस रेड अलर्ट जारी; पुढील 60 दिवस 'हा' घाट पर्यटनासाठी बंद

पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

Pune Red Alert पुणे आणि आजुबाजूच्या परिसरात हवामान खात्याने ( Red Alert) आज (20 जुलै) आणि उद्या (21 जुलै) रेड अलर्ट (Pune Weather forecast) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मात्र पुणे आणि आसपासच्या परिसरात हवा तेवढा पाऊस झाला नाही आहे. त्यामुळे शहराला पावसाची गरज आहे. चार धरणं मिळून फक्त 10 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. 

मागील दोन दिवसांपासून पुण्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुण्यातील अनेक परिसरात नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. एकाच दिवसाच्या पावसाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रत्येकाला काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

घाटमाथ्यावरील लोकांनी काळजी घ्या! 

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे . 

मढे घाट 60 दिवस बंद

वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील 60 दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहे. हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये 200 ते 300 फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर भारतीय दंड. संहिता 1908 कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा-

Amravati Melghat : झाडाच्या आश्रय घ्यायला गेले अन् घात झाला; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू, तर आठ जण जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget