एक्स्प्लोर

Pune : विविध मागण्यांसाठी पुणे विभागातील स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन

Pune Railway Station Master Protest : विविध मागण्यासाठी देशभरातील 68 विभागीय कार्यालयावर हे धरणे आंदोलन करण्यात आले. 

पुणे : रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या संदर्भात रेल्वेच्या देशभरातील स्टेशन मास्तरांचे आंदोलन सोमवारी (12 ऑगस्ट रोजी) पार पडले. या आंदोलनात रेल्वेचे सर्व विभागातील स्टेशनमास्तर सहभागी झाले. दरम्यान पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या वतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

स्टेशन मास्तरांच्या मागण्या काय?

  • ट्रेन ऑपरेशन मध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्टेशन मास्टर कॅडर मध्ये रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. 
  • दुहेरी मार्गावरील सर्व स्थानकावर अतिरिक्त स्टेशन मास्तरांची नियुक्ती करण्यात यावी.अंतर विभागीय "विनंती बदली" प्रक्रियेत पारदर्शकता असावी. 
  • लोणावळा ते दौंड विभागात सहा तासाच्या रोस्टरसाठी "जॉब अनालिसिस" करणे आवश्यक आहे. 
  • प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातील सर्व मोठ्या स्थानकावर सुपरवायझर स्टेशन मास्टरची नियुक्ती करण्यात यावी. 
  • स्टेशन मास्तरांच्या बदल्या करताना त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. 
  • सर्व स्थानकावर आर ओ वॉटर पुरिफायर ची तरतूद करावी.सर्व स्थानकावर विश्रांती कक्ष सुविधाची तरतूद करावी. 
  • महिला स्टेशन मास्टर साठी चेंजिंग रूमची उभारणी करण्यात यावी.

यासह विविध मागण्यासाठी देशभरातील 68 विभागीय कार्यालयावर हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, सेक्रेटरी जनरल - डी एस अरोरा, झोनल सचिव अजय सिन्हा, पुणे विभागीय अध्यक्ष कृष्ण मुरारी, सचिव पुरुषोत्तम सिंह, ऑर्गनसिंग सेक्रेटरी अमित कुमार, स्टेशन मास्टर प्रल्हाद कुमार , दिनेश कांबळे यांच्यासह स्टेशन मास्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

धनंजय चंद्राते म्हणाले, दिवस रात्र वेगवेगळ्या संकटावर मात करत स्टेशन मास्तर रेल्वे स्टेशनवर काम करत असतात. रात्र पाळी करून देखील त्याचा भत्ता मिळत नाही, सुरक्षा भत्ता दिला जात नाही. लढल्या शिवाय कोणती गोष्ट मिळत नाही त्यामुळे आगामी काळात देखील आपल्या मागण्या जोरदारपणे मांडव्या लागतील. जे आपल्या हक्काचे आहे ते आम्ही हक्काने मिळवून घेणार. महिला कर्मचारी यांच्यासाठी वेगळे बाथरूम आणि चेंजिंग रूम असणे आवश्यक आहे. 

विनोद नायर म्हणाले, अस्मा संघटना माध्यमातून आपल्या हक्कंसाठी आम्ही लढत आहे. सेफ्टी ड्राईव्हसाठी आम्ही सर्वात प्रथम पाऊल उचलले. सेफ्टी ड्राईव्हसाठी सध्या दबाव टाकला जात आहे. त्याची भीती वाटू लागली तर चूक होऊ शकतील. कोणताही अपघात घडू नये यासाठी स्टेशन मास्तर काळजी घेत असतात. 

स्टेशन मास्तर राकेश कुमार म्हणाले, गाड्या वाढत आहे पण स्टेशन मास्तर संख्या वाढत नाही. प्रत्येक स्टेशनवर दोन तरी किमान स्टेशन मास्तर असावे. स्टेशन मास्तर यांना मारहाण घटना घडतात त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. संघटना एकत्रित  असणे गरजेचे आहे. कामाचा भार वाढून देखील भत्ते वाढत नाही. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अनेकजण मुदतपूर्व निवृत्ती घेत आहे.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Baramati News: “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget