एक्स्प्लोर
पुण्यात 12 नामांकित हॉटेल-हुक्का पार्लरवर पोलिसांचे छापे
हॉटेल आणि हुक्का पार्लरवर वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील तब्बल 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर मध्यरात्रीनंतर छापा टाकण्यात आला. कारवाईच्या वेळी 6 ते 7 हजार तरुण-तरुणी या ठिकाणी उपस्थित होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे आणि आर्थिक शाखेने काल (शनिवार) रात्री एक ते आज (रविवार) पहाटे चार वाजताच्या दरम्यान ही कारवाई केली. हॉटेल आणि हुक्का पार्लरवर वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच हुक्का जॉईंट्सवर इतकी मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्रीनंतरही हॉटेल-हुक्का पार्लर सुरु ठेवल्याने ही कारवाई केल्याची माहिती आहे. कोणकोणत्या हॉटेल/पबचा समावेश? 1. मॅकलॅरेन्स पब 2. डेली ऑल डे 3. द बार स्टॉक एक्स्चेंज (कोरेगाव पार्क) 4. वायकी 5. नाईट रायडर 6. नाईट स्काय 7. वेस्टिन 8. पेंटहाऊस 9. हार्ड रॉक 10. ऑकवूड लाऊंज 11. ब्लू शॅक (मुंढवा) 12. मायामी, जेडब्ल्यू मॅरिएट (चतुःश्रुंगी)
आणखी वाचा























