Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपासात दिरंगाई आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा ठपका
Pune Porsche Car Accident : वरिष्ठांना वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
Pune Porsche Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली असून पुणे अपघात प्रकरणी पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.
माहिती न देण्यामागे अधिकाऱ्यांचा हेतू काय होता?
निलंबित करण्यात आलेले राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी हे दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता, त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप केले जात होते. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात दिरंगाई करण्याला दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
नशेत असला तरी गाडी चालवायला दे, वडिलांचा ड्रायव्हरला आदेश
पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी बिल्डर विशाल अगरवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अपघातात विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दोघांना कारखाली चिरडलं.
या घटनेवेळी विशाल अगरवालचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. पण 'गाडी तू चालवत होतास हे पोलिसांना सांग' असं विशाल अग्रवाल यांनी आपल्याला सांगितलं असल्याचं ड्रायव्हर गंगाराम पुजारीने जबाबात म्हटलं आहे.
अपघात घडला तेव्हा विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता, पाठीमागे त्याचा दोन मित्र बसले होते आणि ड्रायव्हर गंगाराम पुजारी शेजारच्या सीटवर बसला होता. ब्लेक बारमधून बाहेर पडल्यावर ड्रायव्हरने मुलाच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना मुलगा कार चालवण्याच्या स्थितीत नाही हे सांगितले होते, पण तरीही त्याला गाडी चालवायला दे असं विशाल अग्रवाल यानी म्हटल्याचं त्यांच्या ड्रायव्हरने कबुली जबाबात म्हटलं आहे.
ही बातमी वाचा :