Vishal Agraval Arrested : विशाल अग्रवालने एका हॉटेलमध्ये तीन रुम बुक केल्या अन् पोलिसांना गुंगारा देत भलत्याच हॉटेलमध्ये गेला; पण पोलिसांच्या तावडीत सापडलाच!
विशाल अग्रवाल, ड्रायव्हर चत्रभूज बाबासाहेब डोळस आणि राकेश पौडवाल या तिघांना अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरमधील एका हॉटेलमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल या अटक झाली आहे
पुणे : कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी नगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलीस क्राईम ब्रांच आणि छत्रपती संभाजी नजर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत विशाल अग्रवाल, ड्रायव्हर आणि एकाला अटकर करण्यात आली आहे. पहाटेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिळून कारवाई केली आहे.
विशाल अग्रवालला कसं पकडलं?
विशाल अग्रवाल, ड्रायव्हर चत्रभूज बाबासाहेब डोळस आणि राकेश पौडवाल या तिघांना अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरमधील एका हॉटेलमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल या अटक झाली आहे. पुणे पोलिस आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांची संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे. अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबलेला आहे, अशी पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. जेपी इंटरनॅशनल नारळी बाग या ठिकाणी तीन रूम बुक आहेत, असंही पोलिसांना कळलं होतं. जे पी इंटरनॅशनल नारळी बाग येथे तीन रूम बुक केल्या पण दोघे थांबले. या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी ड्रायव्हर आणि एकला अटक केली. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता विशाल अग्रवाल हा एका वेगळ्या हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती मिळाली. संभाजी नगरच्या रेल्वे स्टेशन परिसरात अत्यंत साध हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये विशाल पोलिसांना गुंगारा देऊन थांबला होता. पोलिसांनी याच साध्या हॉटेलमधून अग्रवालला अटक केली.
पोलिसांना गुंगारा देत पळाला पण पोलिसांनी हेरलंच!
विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी न्यायालय काय निकाल सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
इतर महत्वाची बातमी-