एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Porcshe Car Accident : बिल्डरचं पोरगं पिझ्झा पार्टी करतो अन् रेड कार्पेट टाकून घरी जातो; तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा; रवींद्र धंगेकर आक्रमक

कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील तपास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी रवींद्र धंगेकर आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहे. 

 पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अपघाताच्या पहिल्यादिवसांपासून पुणे पोलिसांच्या चौकशीवर रवींद्र धंगेकरांनीस टीका केली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर ट्विट करत त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. त्यानंतर आता कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील तपास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी रवींद्र धंगेकर आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहे. 

तपास आधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी शहरात विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करेन , असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे. या प्रकरणात दोन एफआयआर काढण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पुण्यात येऊन पुणेकरांची समजूत काढावी लागली. मात्र दोन एफआयआर का काढले?, याची माहिती दिली पाहिजे आणि या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला आहे. बिल्डरचं पोरगं पिझ्झा पार्टी करतो आणि रेड कार्पेट टाकून पोरगं घरी जातो. पालक पोलीस ठाण्यात मालकासारखे वावरत होते. दोन मुलांचा मृत्यू झाल्याचं त्यांना खंत किंवा वाईट वाटत नव्हतं. मृतांच्या पंचनाम्यासाठी पोलीस आले नाहीत पण आरोपी मुलगा घरी होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

पुण्यात अनेक शहरातून आणि राज्यातून मुलं शिक्षणासाठी येत असतात. अशा घटनांमुळे पुण्याचं नाव खराब होत आहे. राज्यातील पालकांमध्येदेखील भीतीचं वातावऱण निर्माण झालं आहे. आपला मुलगा सुरक्षित आहे का? या पुण्याच्या नावाला तडा लागण्याचं काम पोलीसांमुळे आणि पाकिट संस्कृतिच्या माध्यमातून लागत आहे, असंही ते म्हणाले.

पुण्यात अनेक बेकायदेशीर पब आहेत. त्यासोबतच रुफ टॉप हॉटेल्सदेखील आहे. या ठिकाणी पोलीस जात नाही पाहाणी करत नाही आणि महापालिकेचे अधिकारीदेखील जाऊन पाहणी करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

पोलिसही रडारवर

पुणे रॅश  ड्रायव्हिंग प्रकरणी आता पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत पोलीस आयुक्तांच्या मार्फत नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल दोन-दोन एफआयआरची नोंदणी का करण्यात आली यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी नेमकी कधी झाली सोयाबीनचा तपास या पथकाच्या माध्यमातून केला जाईल.

इतर महत्वाची बातमी-

Kalyani Nagar Pune Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, आरोपीच्या वडिल-आजोबांच्या जबाबात तफावत, पालकांसह पोलिसांचीही चौकशी होणार

Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Embed widget