Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला
Pune Accident Case : पुण्यात रॅश ड्राईव्हिंग करुन दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या पुत्राने रॅप साँग करुन व्हिडीओ शेअर केलाय.
![Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला Pune Accident Case 'Builder Ka Beta So Milli Bell' Vishal Aggarwal's son's rap song porsche car accident Marathi News Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/acbe1f572128d3b5f86841d3fd7e60191716474072250924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Accident Case : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातानंतर विशाल अग्रवाल यांच्या पुत्राच्या नावाने एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील रॅप साँगमध्ये शिवीगाळ करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काही वेळातच हा व्हिडीओ विशाल अग्रवाल यांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओ एका वेगळ्याचं कंटेट क्रिएटरने तयार केलाय. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी यांच्या दिसण्यात सार्धम्य असल्याने हा व्हीडिओ त्याचाच असल्याचा समज झाला होता. हा व्हिडीओ वेदांतचा नाही, असं पोलिसांनी थेट सांगितलं आहे. एबीपी माझा या व्हिडीओची पुष्टी करत नाही. पोलिसांकडून या व्हिडीओचा तपास सुरु आहे. अग्रवाल कुटुंबिय हा व्हिडीओ आमच्या मुलाचा नसल्याचा दावा करत आहेत.
पुण्यात कल्याणनगर परिसरात दोघांचा चिरडून मृत्यू
पुण्यात रविवारी (दि.19) बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या पुत्राने दोघांना चिरडलं. यात दोघांचा दुर्दैवी अंत झालाय. दरम्यान, दोघांना चिरडल्यानंतर पब्लिकने विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पब्लिकने ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, याप्रकरणात बाल न्यायालय मंडळाने त्याला तात्काळ जामीन मंजूर केला होता. त्यानंतर लोकांकडून सातत्याने तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पु्हा एकदा पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर बाल न्यायालय बोर्डाने या बिल्डरपुत्राचा जामीन रद्द करुन 14 दिवस अर्थात 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं.
रॅप साँगमधला कंटेट काय ?
"करके बैठा मै नशे इन माय पोर्शे.. सामने आया कपल मेरे ओ है मेरे नीचे..साऊंड सो क्लिंचे..सॉरी गाडी चढ आप पे 17 साल की उमर.. पैसे मेरे बाप पे...1 दिन में मिल गयी मुझे बेल.. फीर से दिखा दुंगा सडक पे खेल..प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार"
पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळे जामीन मिळाल्याचा आरोप
विशाल अग्रवालच्या मुलाला पैसा, पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळे जामीन मिळाल्याचा आरोप करण्यात येत होता. सोशल मीडियावरही या प्रकरणावरुन संताप व्यक्त करण्यात येत होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करुन मदत केल्याचे आरोप करण्यात येत होते. मात्र, सुनील टिंगरे यांनी हे आरोप नाकारले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune Car Accident : धनाढ्याच्या दारू प्यायलेल्या मुलाला पोलिसांकडून पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न; या 5 गोष्टींमुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)