एक्स्प्लोर

Pune Porcshe Accident News: पुणे अपघात प्रकरणात आता अजित पवारांची एन्ट्री, पोलीस आयुक्तांना फोन करुन म्हणाले..

पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी देखील पुण्याच्या पोलिस आयुक्तांना (Pune Police Commissioner Amitesh Kumar) कारवाईचे आदेश दिले आहेत. 

 पुणे :  पुण्यात अल्पवयीन  (Pune Porsche Car Accident)   मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती.   त्यांनतर  15 तासातच आरोपीला  जामीन  मिळाला.  आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला एवढ्या लवकर जामीन कसा मिळाला? पुणे पोलिसांवर कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव होता का? असे  म्हणून विरोधकांनी  टीकेची झोड उडवली होती. पुणे अपघाताचे प्रकरण तापल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. यानंतर आता या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी देखील पुण्याच्या पोलिस आयुक्तांना (Pune Police Commissioner Amitesh Kumar) कारवाईचे आदेश दिले आहेत. 

पालकमंत्री अजित पवार यांचा  पुणे पोलिस आयुक्तांशी  फोनवर संवाद साधला आहे. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य कायदेशीर निर्णय घ्यावा, असे आदेश अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना  दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे  अग्रवाल बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केलाय.  विशाल अग्रवाल आणि सुनील टिंगरे यांचे व्यावसायिक संबंध होते  त्यामुळंच आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलीस ठाण्यात बसून होते असा दावा विनिता देशमुख यांनी केला  होता. 

अजित पवारांच्या आमदारावर पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप 

विनिता देशमुख यांच्या आरोपानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी झालेल्या आरोपांवर  स्पष्टीकरण देखील  दिले होते. सुनील टिंगरे म्हणाले होते की, माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती पहाटे 3 च्या सुमारास कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल अगरवाल यांनीही फोन केला. अगरवाल यांनी त्यांच्या मुलाचा अॅक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही.

पोलिसांकडून कारवाईचा धडाका

पुणे पोलिसांनी पहिल्या दिवशी कामात दिरंगाई केली असली तरी मागील 24 तासात गवान कारवाई केली आहे  पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले. तसेच वेदांत अग्रवाल याने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते आणि तो ज्या पबमध्ये गेला होता, तेथील मालक, मॅनेजर आणि बार टेंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.  

Video :

हे ही वाचा :

पुणे पोलिसांच्या कारवाईची गाडी टॉप गिअरमध्ये, एक-एक करुन सर्वांनाच उचललं, मुलाच्या वडिलांपासून पब-बारचा मालक सगळेच जेलमध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget