एक्स्प्लोर

Pune Vasant More : एकीकडे उमेदवारीची चर्चा; दुसरीकडे मराठा समाजाच्या बैठकीतून वसंत मोरे तडकाफडकी निघून गेले; पुण्यात नेमकं काय घडलं?

वसंत मोरेंनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्यानंतर आता त्यांनी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती.बैठक झाल्यानंतर वसंत मोरे तडकाफडकी निघून गेल्याचं दिसून आलं. 

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha Constituency) प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil)यांनी मराठा आंदोलकांना दिला होता. यातून मराठा लोकांच्या मतदानाची ताकद दाखवून द्या, असंही ते म्हणाले होते. प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार, याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच पुण्यातील काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरेंनी (Vasant More) महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्यानंतर आता त्यांनी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत काही प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. ही बैठक झाल्यानंतर वसंत मोरे तडकाफडकी निघून गेल्याचं दिसून आलं. 

नेमकं काय घडलं?

वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रवींद्र धंगेकरांचीदेखील भेट घेतली. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं वारंवार बोलून दाखवलं. मात्र महाविकास आघाडीकडून रवींंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली . त्यानंतर वसंत मोरेंनी डाव साधला आणि थेट  मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली.  पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे तिसरे उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पत्रकारांनी वसंत मोरेंना घेरलं आणि त्यांना पुण्यातून मराठा समाजाचे उमेदवार तुम्ही असणार का?, असा प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र बैठकीमधील बाकी कार्यकर्त्यांनी  वसंत मोरे यांना हटकलं आणि वसंत मोरेंना विचारलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा प्रयत्न केला. हे सगळं पाहून वसंत मोरे चिडले आणि तडकाफडकी निघून गेले. 

मराठे वसंत मोरेंना पाठिंबा देणार का?

पुण्यात लोकसभेची निवडणूकीसाठी सुरुवातीला महायुतीकडून मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ही लढत एकहाती होण्याची दाट शक्यता होती. मात्र त्यांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराची महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु होती. त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर करण्यात आलं. या दरम्यान वसंत मोरे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे आणि पुण्यात यंदा वेगळा प्रयोग पाहायाल मिळेल, असं म्हटलं होतं.  वसंत मोरे हे नगरसेवक असले तरी पुण्यात त्यांचे नाव सर्वांना परिचित आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा असते. सोशल मीडियावरदेखील ते प्रसिद्ध आहेत. या बैठकीत हजेरी लावल्यामुळे वसंत मोरे मराठा समाजाकडून उमेदवार म्हणून समोर येतात का? आणि मराठे त्यांना पाठिंबा देणार का?  हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

इतर महत्वाची बातमी-

Maval Loksabha Constituency : मावळमध्ये ठाकरे गटाचा दावेदार ठरला! महायुतीविरोधात संजोग वाघेरे मैदानात

 
 
 
 
 
 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget