(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maval Loksabha : मावळ लोकसभेत कमळाचा खासदार होणार, भाजपने शड्डू ठोकले; श्रीरंग बारणे नव्हे बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची मागणी
Maval Loksabha 2024 : मावळ लोकसभेतून यावेळचा (Maval Loksabha) खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणणार, असा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.
मावळ, पुणे : मावळ लोकसभेतून यावेळचा (Maval Loksabha) खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणणार, असा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. पण तो उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे नको तर मावळमधील भाजपचे बाळा भेडगेचं असतील, असे सूतोवाच मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केलाय. तर मी मावळ लोकसभेची निवडणूक लढावी अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचं बोलून बाळा भेगडेंनी जाहीर केलं.
भाजप युवा मोर्चाने आयोजित कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. त्यामुळं श्रीरंग बारणेंचे टेन्शन दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेनीं बारणेंना भाजपने ही उमेदवारी देऊ नये, असं म्हणत विरोध कायम ठेवला आहे. अशातच आता भाजपने कमळावर बारणे नाही, तर बाळा भेगडेंना तिकीट देण्याची मागणी केली आहे. मावळ लोकसभेत महायुतीचा वाढलेला हा तिढा बारणेंची डोकेदुखी वाढवत आहे.
रविंद्र भेगडे म्हणाले की, आतापर्यंत अनेकांनी आम्हाला उमेदवार नाही म्हणून हिणवलं. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडे बाळा भेगडेंसारखा उमेदवार आहे. आम्हाला बाळा भेगडेंना खासदार म्हणून पाहायचं आहे. निवडणूक प्रमुख सांगतो की आम्हाला आमच्या मावळचा माणूस दिल्लीला पाठवायचा आहे. यासाठी आपल्याला ताकदीने काम करायचं आहे. भाजपकडे उमेदवार नाही, असं जे म्हणतात त्यांना मला सांगायचं आहे की, आमच्याकडे ताकदीचा खासदारकीचा उमेदवार आहे आणि आमच्याकडे आमदारकीचादेखील उमेदवार आहे. तुम्ही आमचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करा आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु. भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते बाळा भेगडेंना दिल्लीला पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. कमळ चिन्ह फक्त मावळ लोकसभेच घेऊन या निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. आघाडी आणि सर्वाधिक मतदान मावळ विधानसभेतून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ते पुढे बोलताना,राज्याच्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी मित्रपक्षाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी आम्ही तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र आमच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाची बातमी-