पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांनी दिले होते आदेश
PFI Controversy : पुण्यातील पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणात पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांनी दिले होते आदेश pune PFI Controversy pune police register treason fir pune police commissioner पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांनी दिले होते आदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/ce1d100e2380aab048d629fcb81965f91664112996329265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PFI Controversy : पुण्यातील पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणात पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात पीएफआय कार्यकर्त्यांनी आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यामुद्दावर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राजकीय नेत्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिलेल्या कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात देशद्रोहाचे नवीन कलम अॅड करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त यांना देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी कलम 153, 124, 109, 120 ब... हे कलम नव्याने अॅड केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात छापेमारी केली. महाराष्ट्रातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुण्यात या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे जिल्ह्यात पीएफआयचे मुख्य कार्यालय आहे.
तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईविरोधात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याची परवानगी त्यांनी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. त्यानंतरही आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना पीएफआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला. याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांच्या आधीच्या एफआयआरमध्ये काय होतं?
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणा नमूद करण्यात आल्या होत्या. यामध्ये भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा घोषणांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पोलिसांनी देशद्रोहाचे कलम अॅड केले आहेत.
राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया -
पुण्यातील घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केलेय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)