एक्स्प्लोर

Pune News: पुण्यात चितळे बंधू मिठाईवालेंची फसवणूक; नाव वापरत दुसऱ्याच चवीच्या बाकरवाडीची बाजारात विक्री, कशी ओळखाल खरी बाकरवाडी?

Pune News: पुण्यातील नामांकित खाद्यपदार्थांचा ब्रँड असलेलं चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी ही फक्त पुण्यापूर्तीच नव्हे तर संपूर्ण भारतात तसेच विविध देशात सुद्धा प्रसिद्ध आहे.

पुणे: असं म्हणतात पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी ही फक्त पुण्यापूर्ती मर्यादित नसून तिची चव साता समुद्रा पार पोचली आहे. पुण्यातील अनेक नागरिक विदेशात नोकरी किंवा इतर कारणासाठी स्थायित आहेत. मात्र आजही त्यांच्या जिभेवर चितळेच्या बाकरवडीची चव रेंगाळते. असं असतानाच आता चितळ्यांच्या बाकरवडी ची बनावट विक्री कोण करतंय? हे ऐकून पुणेकरांना तर नक्कीच धक्का बसला असेल पण होय चितळे बंधू मिठाईवाल्यांची बाकरवडी त्यांच्याच नावाने कोणीतरी बाजारात विकतय. का काय आहे हा प्रकार पाहूया.

पुण्यातील नामांकित खाद्यपदार्थांचा ब्रँड असलेलं चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी ही फक्त पुण्यापूर्तीच नव्हे तर संपूर्ण भारतात तसेच विविध देशात सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र आता याच चितळे बंधूंच्या बाकरवडी ची बनावट विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडी ची बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून "चितळे स्वीट होम" नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे व आमच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसुन आली.

"चितळे स्वीट होम" यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून  चितळे बंधु मिळाईवाले यांचे असल्याचे भासवुन, नावाचा गैरवापर करुन फसवणुक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी "चितळे स्वीट होम" चे प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही खात असलेली चितळेंची बाकरवडी ही फक्त आणि फक्त तिथे बंधू मिठाईवाले यांचीच आहे ना एकदा तपासून घ्या नाहीतर तुम्हाला देखील चितळेंच्या बाकरवडीच्या नावाखाली फसवणूक केली जाईल होय ही फसवणूक आर्थिक नसली तरीसुद्धा पुणेकरांच्या जिव्हारी लागणारी आहे हे मात्र नक्की.

सर्व माहिती सारखीच वापरली

चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचे भासवून, नावाचा गैरवापर करुन फसवणूक केली असं या तक्रारीत म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत.

चव बदलल्याच्या अनेक तक्रारी आल्या

गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडीची चव बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून 'चितळे स्वीट होम' नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि चितळे बंधूंच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली.

खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले.

अशाप्रकारे 'चितळे स्वीट होम'चे प्रोपा प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिळाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर वापरले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 350, 66(सी), 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा -  Chitale : चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री, 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा दाखल

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Baramati ACB Trap : जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात
जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात
Ketan Agrawal Case: केतनचा कट रचताना रितेशलाही सांगितले होते बारकावे, सिया-चेतनच्या मित्राच्या अटकेनंतर पोलिसांचा मोठा खुलासा, लोहगड प्रकरणात चक्रावणारी माहिती
केतनचा कट रचताना रितेशलाही सांगितले होते बारकावे, सिया-चेतनच्या मित्राच्या अटकेनंतर पोलिसांचा मोठा खुलासा, लोहगड प्रकरणात चक्रावणारी माहिती
Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Pune Nagpur Dj : नियमांचे उल्लंघन, कायद्याचा वचक; पुण्यात 10 दहीहंडी मंडळांवर गुन्हे. तर 116 मंडळांवर न्यायालयीन खटले, नागपुरातही ध्वनिप्रदूषणप्रकरणी तीन गुन्हे दाखल
नियमांचे उल्लंघन, कायद्याचा वचक; पुण्यात 10 दहीहंडी मंडळांवर गुन्हे. तर 116 मंडळांवर न्यायालयीन खटले, नागपुरातही ध्वनिप्रदूषणप्रकरणी तीन गुन्हे दाखल

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Embed widget