एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Bacchu Kadu Statement:शेतकऱ्यांना हत्या करायला लावणार का? बच्चू कडूंच्या विधानावर राजकीय प्रतिक्रिया
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा,' असं वादग्रस्त विधान कडू यांनी बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील पातुर्डा गावात झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत केले. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी प्रसिद्धीसाठी केलेले विधान म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्या हेतू चांगला असला तरी भाषा चुकल्याचे म्हटले आहे. या परिषदेत बोलताना कडू यांनी आत्महत्येपेक्षा आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसण्याचा किंवा मूत्रविसर्जन करण्याचा सल्लाही दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















