एक्स्प्लोर

Bacchu Kadu: महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली, बच्चू कडू यांचा आरोप

Chhatrapati Sambhaji Maharaj news: महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकऱ्यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडाल, असे कडू यांनी म्हटले

Bacchu Kadu on Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदारीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj)  हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेलारे. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे हे शोधाल का?  का कारणीभूत आहे. राजा असा पाहिजे. तो मरण पत्कारायला तयार झाला पण त्याने सासऱ्याला वतन दिले नाही, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटले.  बच्चू कडू यांनी रविवारी बुलढाण्यातील पातुर्डा गावातील शेतकरी हक्क परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरुन राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली.  शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडाल, असे बच्चू कडू यांनी म्हटले. शेतकरी हे जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही, नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहरं श्रीमंत होतील. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पाडलं. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांची बच्चू कडूंवर टीका

शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे, या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले. आमदाराला कापण्याचं काम बच्चू कडू यांनीच करावे. त्यांना शेतकऱ्यांवर आणखी गुन्हे दाखल करायचे आहेत का? त्याऐवजी त्यांनी स्वत:च हे काम करावे. एखादे वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी भान ठेवले पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

आणखी वाचा

उपोषणकर्ता आपल्या दारी! संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न, आंदोलकालाच घरी बोलवून ज्यूस पाजला

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget