एक्स्प्लोर
Bogus Voters Sanjay Raut : महाराष्ट्रात तब्बल एक कोटी मतदार बोगस? राऊतांचा गंभीर दावा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत एक कोटी बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यावर भाजपचे नवनाथ बन (Navnath Ban) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे,’ असा थेट हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत फक्त चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढल्याचा दावाही त्यांनी केला. या कथित घोटाळ्याकडे देशाचं लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी सर्व विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. दुसरीकडे, राऊत यांचे आरोपच बोगस आहेत, मतदार नाही, असे म्हणत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी हा दावा खोडून काढला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement

















