एक्स्प्लोर
TOP 100 Headlines : 12 PM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 20 OCT 2025 : ABP Majha
माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या वादग्रस्त विधानामुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बोगस मतदारांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. 'आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका,' असे संतापजनक आवाहन बच्चू कडू यांनी बुलढाण्यातील शेतकरी परिषदेत केले. यावर मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी टीका केली आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी राज्यात एक कोटी बोगस मतदार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. यावरून मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राऊतांना खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. याचवेळी, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून संजय राऊत यांनी 'भाऊ बंदगी' नाटकाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) कोपरखळी मारली. तसेच, बीडमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून, चार जणांची चौकशी सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















