Pune News: पुण्यातील नामांकित महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लुट? माहितीच्या अधिकारातून माहिती उघड, विद्यार्थी आक्रमक
Pune News: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला तर कायदेशीर कारवाई करू, अशा नोटीस महाविद्यालयात लावून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणण आहे.

पुणे: पुण्यातील नामांकित आयएसएस लॉ (ILS law) महाविद्यालयाकडून अतिरिक्त फी उकळली जात आहे, असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली होती, त्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली होती. चार ते पाच हजार फी ऐवजी 41 ते 42 हजार रुपये फी घेतली जात आहे, त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला तर कायदेशीर कारवाई करू, अशा नोटीस महाविद्यालयात लावून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणण आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था असणारी आयएसलॉ कॉलेज या शिक्षण संस्थेमध्ये अगदी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यासह राज्यातील अनेक बड्या वकिलांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं. त्याच शिक्षण संस्थेमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारातून मागवलेल्या माहितीनुसार, चार ते पाच हजार फी ऐवजी 41 ते 42 हजार रुपये फी घेतली जात आहे, त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ज्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतच नाही, त्यातून हजारो टक्के नफा महाविद्यालय मिळवत असल्याचे समोर आले आहे.
महाविद्यालयाला शासनाकडून अनुदान मिळत असले तरी देखील महाविद्यालय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांकडून लूट का करत आहेत? अशा प्रकारचा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच यातून कमावलेला पैसा नेमका कुठे जातोय? हा देखील प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI





















