एक्स्प्लोर

Mumbai Pune Express Highway : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज दोन तासांचा ब्लॉक, वेळ पाहा आणि मग प्रवास करा!

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करणार असल्याने आज हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.  दुपारी 12 ते 2 या वेळेत  बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे : तुम्ही जर आज म्हणजेच 1 फेब्रुवारीला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास(mumbai pune express highway) करणार असाल तर ही बातमी वाचूनच प्रवासाला निघा. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करणार असल्याने आज हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.  दुपारी 12 ते 2 या वेळेत  बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक बंद राहील, असं  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितलं आहे. 

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई -पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. तसेच जुना पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळवलं आहे.

यापूर्वीही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा असे ब्लॉक घेण्यात आले आहे. अनेकदा ब्लॉक घेऊन ही कामं करण्यात आली आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकवेळी दोन तासांचाच ब्लॉक घेण्यात येतो. मात्र काम लवकरात लवकर संपवण्याकडे कल असतो. आतापर्यंत दोन तासांचा ब्लॉक घेऊन साधारण अर्ध्या किंवा एका तासात काम पूर्ण झालं आहे.

ITMS - इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळं होणारा फायदा

- वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
- यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील. 
- ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
- सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
- अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते     वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
- अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
- अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.-या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करत दोन मित्रांकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
3 Indian Territories on Nepal Currency: आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी
Jaya Kishori Majha Maha Katta : राममंदिर निर्माण का महत्वाचं? जया किशोरी नेमकं काय म्हणाल्या?
Jaya Kishori Majha Maha Katta सेल्फ डाऊट आणि तणाव यावर नियंत्रण कसं ठेवावं,काय म्हणाल्या जया किशोरी?
Supreme Court Local Body Election : निवडणुका होणारच, स्थगिती नाही...; महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
3 Indian Territories on Nepal Currency: आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Embed widget