एक्स्प्लोर

Pune Loksabha Election : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या धडाधड तक्रारी; 1 हजार 500 तक्रारींवर कार्यवाही

: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1  हजार 505 तक्रारींपैकी 1 हजार 329 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1  हजार 505 तक्रारींपैकी 1 हजार 329 तक्रारींमध्ये(Pune Loksabha Election) तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित 176 तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वीत आहे. 

सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. अशा प्रकारे 15 मार्चपासून आतापर्यंत 1  हजार 505 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १ हजार ३२९ तक्रारींवर कारवाई तर उर्वरित 176 तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. 

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी आणि कंसात कारवाई झालेल्या तक्रारी

आंबेगाव विधानसभा-23 (16), बारामती-54 (३०), भोर-3 (2), भोसरी-4 (3), चिंचवड-33 (22), दौंड-28 (19), हडपसर-47 (40), इंदापूर-47 (40), जुन्नर-36 (35), कसबापेठ-247 (223), खडकवासला-78 (71), खेड आळंदी-3 (1), कोथरूड-43 (32), मावळ-45 (30), पर्वती-258 (257), पिंपरी-11 (9), पुण कॅन्टोन्मेंट-109 (91), पुरंदर-11 (8), शिरूर-32 (15), शिवाजीनगर-71 (70) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात - 321 (315) अशा एकूण 1 हजार 505 तक्रारी प्राप्त झाल्या व 1 हजार 329 तक्रारींवर कारवाई झाली.

जिल्ह्यात चौथ्या  टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर  लोकसभा मतदासंघाकरीता  सोमवार 13  मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Amol Kolhe : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; भर सभेत अमोल कोल्हेंचं अजितदादांना आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget