Bike Stunt : जीवावर उदार होऊन 'ती' थेट बुलेटवर राहिली उभा; वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज, पण माधवीने पुन्हा केला स्टंट!
Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : स्टंट व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धक्का बसेल. जर ही तरूणी गाडीवरून खाली पडली तर तिच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो.
Social Media Stunt Video: आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सोशल मिडियावरती रिल्स, व्हिडिओ बनवण्यात, आणि पाहण्यात दंग असल्याचं दिसून येतं. मात्र, याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याचदा असे व्हिडिओ दिसतात की अंगावर काटे येतात. लाईक आणि प्रसिध्दीसाठी लोक आपल्या जीवाशी खेळतात. गेल्या अनेक वर्षापासून सोशल मीडियावर स्टंटबाजीचे (Stunt Video) अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळत आहेत. त्यातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी बुलेटवरती उभारल्याचं दिसत आहे. स्टंट व्हिडिओ (Stunt Video) पाहून प्रत्येकाला धक्का बसेल. जर ही तरूणी गाडीवरून खाली पडली तर तिच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो. पुण्यातील या तरूणीला आधीही पोलिंसांनी समज दिला होता. मात्र, पुन्हा एकदा स्टंटबाजी केल्याचं समोर आलं आहे. (Stunt Video)
वर्षभरापूर्वी याच स्टंटबाजीमुळे पोलिसांनी समज दिली होती
वर्षभराआधीच पोलिसांनी या रिल बनवणाऱ्या तरूणीला समज दिला होता, मात्र पुन्हा तिने हे रिल टाकल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. पुण्यातील फुरसुंगीतील तरुणीची पुन्हा एकदा स्टंटबाजी समोर आली आहे. वर्षभरापूर्वी याच स्टंटबाजीमुळे पोलिसांनी तिला समज दिली होती. पुण्यातील इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली माधवी कुंभार तिने पुन्हा एकदा बुलेटवर स्टंटबाजी करण्याचा रील इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहे.
हे रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अतिशय साहसी पद्धतीने हा रील शूट केल्याचं दिसत आहे. बुलेटवर चक्क उभे राहून तिने ही स्टंटबाजी केली आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असले स्टंट करत असल्याचं दिसून येते. पुण्यातील माधवी कुंभार हिला एक वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे स्टंटबाजी केल्यामुळे पोलिसांनी बोलवून समज दिली होती. मात्र, त्यानंतरही माधवीने हा प्रकार सुरूच ठेवल्याचं दिसून येते. यावर आता पोलीस पुन्हा एकदा तिला बोलवणार का? तिला समज देणार का? की तिच्यावर कठोर कारवाई करणार? हे पाहावं लागणार आहे.