एक्स्प्लोर

Pune News: पुणेकरांनो विकेंडला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हे वाचा; 'या' पिकनिक स्पॉटवर नो एंट्री, प्रशासनाकडून सक्तीचा आदेश

Pune News: लोणावळा आणि मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई करण्यात आली आहे.

पुणे: पावसाने यंदा मान्सूनपूर्वीच हजेरी लावली आहे, त्यामुळं निसर्ग ही बहरुन गेला आहे. हे पाहता, जर तुम्ही लोणावळा अथवा मावळ तालुक्यात वर्षाविहाराचे नियोजन करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण लोणावळा आणि मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अख्ख कुटुंब धबधब्यात वाहून गेलं होतं, या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या पर्यटनस्थळी कलम 163 लागू केलं आहे, या दरम्यान पर्यटकांनी या पर्यटनस्थळी जाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. या पर्यटनस्थळातून भुशी धरण मात्र वगळण्यात आलेलं आहे, त्यामुळं हिरमोड झालेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. हा आदेश 31 ऑगस्ट 2025 पर्यंत लागू असेल.

पर्यटकांना कुठं-कुठं मनाई आहे?

एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असून त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यानुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता- 2023 चे कलम 163 प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लागू केलेत. त्यामुळं या पावसाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दि.07/06/2025 ते दि.31/08/2025 पर्यंत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे.

नियमावली काय असेल?

1. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे.
2. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
3. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरणे करणे.
4. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
5. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
6. वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालविणे,
7. वाहनांची ने आण करताना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
8. सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.
9. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
10. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगित यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, गाडीतील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.
11. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
12. धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे. (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून).

नियमांचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई?

सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र /कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget