Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यावर आणि आगाखान पॅलेस येथे भव्य रोषणाई
भारतामध्ये आज शंभर कोटी लसीकरणाचे डोस पूर्ण झाल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा होतोय. याचनिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्यावर आणि आगाखान पॅलेस येथे भव्य रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारवाड्यावर रोषणाईच्या माध्यमातून तिरंगा साकारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारवाडा रोषणाईने उजळून निघाला आहे. कोरोनामुळे बंद असलेला शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पुन्हा एकदा रोषणाईने उजळून निघालेत. हे क्षण बघण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केलीये.
बॅक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दिवसाढवळ्या दरोडा, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील घटना
पुणे : शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा पडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरोडेखोरांनी ओळख लपवण्यासाठी कानटोप्या घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरोडेखोरांनी लुटीसाठी वापरलेल्या गाडीवर प्रेस असं लिहिल्याचंही काहींनी सांगितलं. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख पिंपरखेडकडे रवाना झाले आहेत.
पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी
पुण्यातून जाणाऱ्या पुणे- बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ एका केमिकल टॅंकरचा भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू झालाय. कालच या ठिकाणी एका ट्रकने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला होता. महामार्गाच्या सदोष रचनेमुळे हा भाग मृत्यूचा सापळा बनलाय.
पुण्यातील नवले उड्डाणपूल परिसरात ज्वलनशील द्रवपदार्थ वाहून नेणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 गंभीर जखमी
पुण्यातील नवले उड्डाणपूल परिसरात ज्वलनशील द्रवपदार्थ वाहून नेणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 गंभीर जखमी झालेत.
अजित पवारांचा नियोजित दौरा रद्द
अजित पवार त्यांच्या आजच्या नियोजित दौऱ्यातील शेवटचा कार्यक्रम रद्द करून मुंबईला गेले असले तरी शरद पवार मात्र संध्याकाळी बारामतीत मुक्कामाला आलेत. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी आपण भेटणार असल्याच म्हटले होते.
उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज आणि गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार
उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज आणि गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 या परिक्षेच्या निकालापासून याची सुरुवात होणार आहे. देशात प्रथमच असा प्रयोग होत असल्यामुळे निकालात पारदर्शकता येणार आहे. गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी उमेदवारांना उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांना आपल्याला किती गुण भेटले आहेत हे समजणार आहे
कोरेगाव भीमा प्रकरणी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग यांना 8 नोव्हेंबरला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश
कोरेगाव भीमामधील 1जानेवारी 2018 ला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगाकडून रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग या दोन पोलीस अधिकाऱ्यांना आठ नोव्हेंबरला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. कोरेगाव भीमाची घटना घडली तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. तर परमबीर सिंग राज्याचे लॉ एन्ड ऑर्डर विभागाचे डी जी होते. त्यामुळे या दोघांची भूमिका जाणून घ्यायची असल्याने दोघांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलय. हे दोघे जर प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत तर त्यांनी लेखी स्वरूपात त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुभाही देण्यात आली आहे.