Pune News : पुण्यात शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; आई-आजीने हंबरला फोडला अन् परिसरात आक्रोश पसरला!
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आज दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत.
पुणे : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आज दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत. श्रद्धा काळू नवले (वय 13 इयत्ता सातवी) सायली काळू नवले (वय 11 इयत्ता पाचवी ) दीपक दत्ता (वय- ०७ राहणार- कान्हेवाडी राजगुरुनगर) राधिका नितीन केदारी (वय -14 राहणार कानेवाडी राजगुरुनगर)अशी नावे आहेत. श्रद्धा आणि सायलीही दोन्ही मुले गोरक्षनाथ बबन कवठे (राहणार जवळे बाळेश्वर संगमनेर जिल्हा नगर) यांनी दत्तक घेतली आहेत.
कवठे हे शेतमजुरीचे काम करत आहेत. ही दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शिक्षण घेत होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती. त्यांना पोहता येत नव्हते. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याजवळ गेले. पण तोपर्यंत मुलांची प्राणज्योत मालवली होती. देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे यांनी भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेचारही मुलांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबांवर शोक काळा पसरली.
चार विद्यार्थी गेल्याची माहिती कळताच त्यांच्या आई-वडिल आणि आजी थेट रुग्णालयात पोहचले. यावेळी आई- वडिल आणि आजीबोरबरच कुटूंबातील अनेकांनी हंबरडा फोडला. चारही मुलं हसती खेळती होती. मज्जा म्हणून पाण्यात उतरली आणि काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं. या चौघांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि हसत्या खेळत्या घरात दु:खाचा डोंगर पसरला आहे.
पुण्यात दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू
दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोघांना दुर्दैवी मृत्यू झाला होता. आर्यन नवले आणि आयुष नवले, अशी साधारण तेरा वर्षीय बुडालेल्या मुलांची नावं होती. एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने नवले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. यामुळे पाबळ गावात हळहळ व्यक्त केली गेली
इतर महत्वाची बातमी-