एक्स्प्लोर

तीन बोट उलटल्या, डोंबिवलीत आगडोंब, आठवडाभरात 40 जण दगावले, राज्यातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटना!

Maharashtra News : महाराष्ट्रात या आठवड्यात 10 दुर्घटना घडल्या. यात 40 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. 29 जणांचा बुडून मृत्यू झाला तर डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटामुळे 11 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : महाराष्ट्रात या आठवड्यात 10 दुर्घटना घडल्या असून यात 40 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 29 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटामुळे (Dombivli MIDC Blast) आतापर्यंत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पाहूयात या आठवडाभरातील महाराष्ट्रातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या घटना...

1. डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, 11 कामगारांचा मृत्यू

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गुरुवारी भला मोठा स्फोट झाला. त्यानंतर अनेक छोटे स्फोट झाले. या घटनेत आतापर्यंत 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या भीषण स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीतील धोकादायक केमिकल कंपनींना डोंबिवलीच्या हद्दीतून बाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

2. सिंधुदुर्गात बोट उलटली, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात (Sindhudurga  Boat Accident) मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन बोट जात असताना ती अचानक उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट उलटल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. दोन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

3. उजनी बोट दुर्घटनेत सहा जणांना जलसमाधी

21 मे रोजी  इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) डोंगरे व जाधव कुटुंब अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोतेने प्रवास करत होते. अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. त्यानंतर तब्बल 40 तास शोधमोहीम राबवण्यात आली. या घटनेत सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. गोकूळ दत्तात्रय जाधव (30), कोमल गोकूळ जाधव (25), शुभम गोकूळ जाधव (दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (3), अनुराग अवघडे (35), गौरव डोंगरे (16) अशी मृतांची नावे आहेत.

4. प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटली, सहा जणांचा मृत्यू

प्रवरा नदीत (Pravara River) दोन तरुण पोहण्यासाठी आले असता दोघेही पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याला शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र एसडीआरएफची बोट शोधकार्य सुरु असताना अचानक उलटली. या बोटीत पथकातील पाच जणांसह एक स्थानिक नागरिक बुडाला होता. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे नदीत पोहण्यासाठी आले होते. दोघांचे मृतदेह सापडले आहे. धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा, आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे), अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिंमतराव पवार यांना बाहेर काढण्यात यश आले होते. दोघांवर सध्या उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. 

5. भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू

नाशिकच्या  इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14) अशी मृतांची नावे आहेत. 

6. बीड जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (ता.अंबाजोगाई) येथील महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. द्रौपदी संतोष गोईनवाड, पूजा (7), सुदर्शन (7) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

7. मुंढेगावला विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका नवनाथ दराणे (23) आणि वेदश्री नवनाथ दराणे (03) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे. विहिरीला कठडा नसल्यामुळे विहिरीजवळ गेलेली बालिका विहिरीत पडली. बालिकेला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी, असा शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

8. सिन्नरमध्ये बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कुंदेवाडी (Kundewadi) या ठिकाणी देव नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी (दि. 23) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आंबेडकरनगर वावी या ठिकाणी राहणारे दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघेही सोळा वर्षीय तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.    

9. नागपूरमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू  

नागपूर येथील वाठोडा परिसरातील काही मित्र फिरायला आले होते. तलावात पोहायला गेलेल्या विनीत राजेश मनघटे (18) या तरुणाचा मृत्यू झाला. आज गुरुवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. गावातील पोहणाऱ्या तरुणांनी मृतदेह बाहेर काढला.  

10. पुण्यात दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोघांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन नवले  आणि आयुष नवले, अशी साधारण तेरा वर्षीय बुडालेल्या मुलांची नावं आहेत. एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने नवले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. यामुळे पाबळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget