एक्स्प्लोर

Amey Khopkar :'हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द',अमेय खोपकरांचं ट्विट;  दामोदर नाट्यगृहासाठी मनसे मैदानात

Amey Khopkar : दामोदर नाट्यगृहासाठी आता मनसेकडूनही भूमिका जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अमेय खोपकरांनी ट्विट केलं आहे. 

Amey Khopkar : सध्या परळ येथील दामोदर नाट्यगृह (Damodar Natyagruha) हे बरचं चर्चेत आहे. गेल्या 100 वर्षांपासून लावणी, नाटक, तमाशा आणि लोककललेची अभिजात परंपरा हे नाट्यगृह जपत आलं. पण मागच्या बऱ्याच काळापासून हे नाट्यगृह  पुनर्बांधणीच्या मुद्द्याखाली बंदिस्त झालंय. जवळपास 1 नोव्हेंबर पासून या नाट्यगृहाचा पडदा  पुनर्बांधणीच्या नावाखाली बंद करण्यात आलाय.आहे ते नाट्यगृह जमीनदोस्त नाट्यगृह छोटंसं बांधून त्याचा एफएसआय दुसरीकडे वापरण्यात येणार आहे, त्यामुळे कलाकार मंडळींकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. त्यावर आता मनसेकडूनही त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अमेय खोपरकांनी (Amey Khopkar) ट्वीट करत या सगळ्यावर भाष्य केलंय. 

दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना पूर्वी पेक्षा लहान आणि त्या जागेवर दुसरी शाळेची वास्तू उभारली जात आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या चुकीच्या पुनर्बांधणी विरोधात आणि नाट्यगृह मोठं आणि अत्याधुनिक उभाराव, जुन्या संस्थांना, कलाकारांना कार्यालयं द्यावी या मागणीसाठी यापूर्वी सोशल सर्व्हिस लीगने आणि कलाकार मंडळी यांनी आंदोलन केलं होतं. मात्र प्रशासन दाद देत नसल्याने आता कलाकार मंडळी पुन्हा उपोषण करण्याचा तयारीत  आहेत.

अमेय खोपकरांचं ट्विट काय?

अमेय खोपकरांनी ट्विट करत म्हटलं की, 'गिरणगावातील दामोदर नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद आहे असा समज होता, पण खरं कारण आता लक्षात आलेलं आहे. ऐतिहासिक असं हे नाट्यगृह जमीनदोस्त करुन तिथे सीबीएसई शाळा उभारण्याचा महापालिकेचा मनसुबा आहे. हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. नाट्यगृहाचं आरक्षण हटवून शाळेच्या नावाखाली पैसे ओरबाडण्याचा महापालिकेचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कामगार चळवळीचं साक्षीदार असलेलं हे दामोदर नाट्यगृह तेवढ्याच दिमाखात उभं राहणारंच !' 

दामोदर नाट्यगृहाबद्दल जाणून घ्या...

परळच्या दामोदर नाट्यगृहात विविध समाजसंस्थांचे कार्यक्रम तसेच नाटकांच्या तालमीदेखील होत असे. लहान-मोठ्या कलाकारांसाठी ते हक्काचं व्यासपीठ होतं. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अनेक रंगकर्मींच्या कारकिर्दीचं ते उमगस्थान आहे. 

मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्विस लीगने 1992 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे.

ही बातमी वाचा : 

Aditya Sarpotdar : बॉलीवूडच्या शर्यतीत मराठी दिग्दर्शकाची आगळीवेगळी कलाकृती, आदित्य सरपोतदारच्या 'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget