Sasoon Dean Dr. Vinayak Kale : 'मॅट'मध्ये लढले अन् जिंकले! ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली आहेत. काल बुधवारी (29 नोव्हेंबर) रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे.
![Sasoon Dean Dr. Vinayak Kale : 'मॅट'मध्ये लढले अन् जिंकले! ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती Pune News dr Vinayak Kale appointed as dean in sasoon hospital Maharashtra Marathi News Sasoon Dean Dr. Vinayak Kale : 'मॅट'मध्ये लढले अन् जिंकले! ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/30/16b93f6942defd69fc78ad8b6cf5d3711701321039137442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News: पुणे : ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली आहेत. काल बुधवारी (29 नोव्हेंबर) रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे, काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार असून आज (गुरुवार) ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
2023 मध्येच त्यांची जानेवारी महिन्यांत बदली करणयात आली होती. शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर त्यांची बदली केली होती . त्यानंतर डॉ. संजीव ठाकूर यांची विनायक काळे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या सगळ्या विरोधात डॉ. काळे यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल काळे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र त्याच नंतर लगेच डॉ संजीव ठाकूर यांनी मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच आव्हान दिले आणि त्यानंतरही डॉ. काळे यांच्या बाजूनेच निकाल लागला. त्यामुळे त्यांची आता पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.
हे सगळं सुरु असतानाच ललित पाटील ड्रग्स प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने पदमुक्त केले. त्यानंतर काळे नियुक्त होण्याची चर्चा होती. अखेर डॉ. काळे यांच्या नावाचा आता ऑर्डर निघाला आहे. ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची आता शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)