एक्स्प्लोर

Pune News: दोन लाखांची पैज ठरली टर्निंग पॉईंट; 54 वर्षीय राजेंद्र गायकवाड यांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पटकावले मेडल

Pune News: शारीरिक कस लागल्याने त्यांनी 2018 मध्ये जिमला सुरुवात केली आणि आरोग्याकडे नवीन दृष्टीने पाहू लागले.

पुणे : जिद्द, चिकाटी आणि स्वतःवरचा प्रबळ विश्वास असेल तर कोणतेही उद्दिष्ट गाठणे अशक्य नाही, याचा जिवंत पुरावा ठरले आहेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील 54 वर्षीय राजेंद्र परशुराम गायकवाड. आरोग्याच्या गंभीर अडचणी, वाढलेले वजन आणि औषधांवर अवलंबून असलेले दैनंदिन आयुष्य या साऱ्या परिस्थितीतून बाहेर पडत त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मेडल जिंकत नवा इतिहास रचला आहे.(Pune News)

दोन लाखांची पैज ठरली टर्निंग पॉईंट

2017 मध्ये गायकवाड यांचे वजन तब्बल 97 किलो होते. सततची डोकेदुखी, बी.पी., शुगर आणि पेनकिलर्सवर जगण्याची वेळ आली होती. त्याच काळात मित्रांच्या आग्रहाने त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. सचिन तात्या तुपे यांनी त्यांना ट्रेकिंगची ओळख करून दिल्यानंतर गायकवाड यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाला. शारीरिक कस लागल्याने त्यांनी 2018 मध्ये जिमला सुरुवात केली आणि आरोग्याकडे नवीन दृष्टीने पाहू लागले.

पैजेतून प्रेरणा, मेहनतीतून मेडल!

दरम्यानच एका मित्रासोबत झालेल्या “सिक्स-पॅक काढलास तर दोन लाख!” या पैजेने त्यांची जिद्द अधिकच पेटली. स्वतःला सिद्ध करण्याच्या निर्धाराने त्यांनी जिम ट्रेनर ओंकार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन महिन्यांचा कठोर वर्कआउट आणि डाएट प्लॅन स्वीकारला. त्यांच्यावर असलेल्या सचिन तुपे यांच्या विश्वासाने त्यांना अधिक बळ दिले.

बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पटकावले मेडल

या शिस्तबद्ध परिश्रमांचे फळ म्हणून गायकवाड यांनी यावर्षी ICN नॅचरल गोवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन कॅटेगरीत सहभाग घेतला. यापैकी एका कॅटेगरीत त्यांनी सिल्वर मेडल तर दुसऱ्यात तृतीय क्रमांक पटकावला. याआधी तीनवेळा सहभाग घेतल्यानंतर अखेर यंदा त्यांनी मेडल जिंकत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्ज्वल केले. वयाच्या पन्नाशी ओलांडल्यानंतर मिळवलेले हे यश केवळ त्यांच्यासाठी नाही, तर फिटनेसच्या मार्गावर निघू इच्छिणाऱ्या असंख्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ICN नॅचरल गोवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा नक्की काय आहे? 

खरंतर, देशभरातील तसेच परदेशातील फिटनेसप्रेमी आणि बॉडी बिल्डर्ससाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ICN नॅचरल गोवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा दरवर्षी उत्साहात पार पडते. ‘I Compete Natural’ (ICN) या जागतिक संघटनेतर्फे आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा पूर्णपणे नॅचरल बॉडी बिल्डिंगला प्रोत्साहन देणारी असल्याने जगभरातील खेळाडूंमध्ये तिचे वेगळे स्थान आहे. या स्पर्धेची सर्वात मोठी खासियत म्हणजे कडक ड्रग टेस्टिंग. WADA-मान्य पद्धतीनुसार स्पर्धकांची तपासणी केली जाते. स्टेरॉइड्स किंवा कोणत्याही प्रकारचे परफॉर्मन्स वाढवणारे औषध वापरल्यास स्पर्धकाला तत्काळ अपात्र ठरवले जाते. यामुळे ही स्पर्धा बॉडी बिल्डिंगमधील नैसर्गिक आणि प्रामाणिक खेळाडूपणा जपणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.

ICN गोवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेन्स फिजीक, बॉडी बिल्डिंग, स्पोर्ट्स मॉडेल, क्लासिक फिजीक, फिटनेस मॉडेल तसेच 40+, 50+ अशा मास्टर्स कॅटेगरींसह विविध विभागांचा समावेश असतो. प्रत्येक कॅटेगरीमध्ये स्पर्धकांचे मूल्यमापन शरीराची सिमेट्री, मसल डेफिनिशन, स्टेजवरील प्रेझेन्स, पोझिंग आणि फिटनेस लेव्हल या निकषांवर केले जाते. भारतातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी ठरते. अनेक भारतीय अ‍ॅथलीट्स येथे मेडल जिंकून पुढील जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा मार्ग मोकळा करतात. याचमुळे ICN नॅचरल गोवा स्पर्धा भारतीय फिटनेस क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या नॅचरल बॉडी बिल्डिंग इव्हेंट्सपैकी एक बनली आहे.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget