(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Muk Morcha: पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं आंदोलन; भर पावसात शरद पवारांसह 'हे' नेते काळी फित बांधून उपस्थित
Pune Muk Morcha: पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं आंदोनल; पावसात शरद पवारांसह हे नेते काळी फित बांधून उपस्थित
पुणे: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार, महापौर, कार्यकर्ते याच्या उपस्थितीत पुण्यात आज भर पावसात हे मूक आंदोलन केले जात आहे. तोंडावर काळा मास्क लावून करणार निषेध व्यक्त केला जात आहे. पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे. रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेनेचे बाबर, प्रशांत जगताप, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाविकास आघाडीच्या अन्य नेत्याच्या उपस्थितीत आज मूक आंदोलन केले जात आहे.आज सकाळी 10 ते 11 या वेळेत शरद पवार यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन केले जात आहे.
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्ष मैदानात उतरली आहे. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु आहे. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फित बांधून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तोंडावर काळी पट्टी किंवा मास्क लावला आहे आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केलं जात आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन केलं जात आहे. भर पावसात सर्वजण उपस्थित आहेत. हातात पोस्टर घेऊन याठिकाणी नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत.