Ravindra Dhangekar Meet Sunetra Pawar : सुनेत्रा पवार अन् रवींद्र धंगेकरांची अचानक भेट; फोटोशूट अन् निवडणुकीसाठी शुभेच्छा!
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची आज पुण्यात भेट झाली.
![Ravindra Dhangekar Meet Sunetra Pawar : सुनेत्रा पवार अन् रवींद्र धंगेकरांची अचानक भेट; फोटोशूट अन् निवडणुकीसाठी शुभेच्छा! Pune MVA Loksabha candidate Canddidate ravindra dhangekar meet baramari mahayuti loksabha candidate sunetra pawar in taljai tekdi Pune Ravindra Dhangekar Meet Sunetra Pawar : सुनेत्रा पवार अन् रवींद्र धंगेकरांची अचानक भेट; फोटोशूट अन् निवडणुकीसाठी शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/07/5ab905204e16370eb585313eefd75c7c1712465632710442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची आज पुण्यात भेट झाली.या भेटीवेळी दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. रवींद्र धंगेकर आणि सुनेत्रा पवार हे दोघेही दणक्यात प्रचाराला लागले आहेत. अनेक परिसरात पिंजून काढताना दिसत आहेत. याचवेळी पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात ही भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला आणि शुभेच्छाही दिल्या.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, उल्हास पवार, दत्ता धनकवडे, आप्पा रेणुसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवाय बरेच कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांसोबत अनेकांनी तळजाई टेकडीवर फोटोशूट केलं आणि दोघांमध्येही चांगल्या चर्चा झाल्या. यावरुन राज्याची राजकीय स्थिती कशीही असली तरीही सुसंस्कृत राजकारणाचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)